Join us

coronavirus: विराटला आठवले अनुष्कासोबतचे ते दिवस, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 16:34 IST

Open in App
1 / 7

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीवरही झाला आहे. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट पूर्णपणे बंद आहे. तर चित्रपटांचे चित्रिकरणही बंद आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या बहुतांश वेळ घरीच व्यतित करत आहेत.

2 / 7

सुमारे तीन महिन्यांपासून घरी असलेल्या विराट कोहलीने अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करून जुन्या दिवसांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

3 / 7

विराट आणि अनुष्का सुट्टीच्या दिवसांमध्ये फिरायला गेले असतानाचा फोटो विराटने शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का नदी आणि पर्वताच्या समोर बसलेले दिसत आहेत.

4 / 7

थ्रोबॅक, जेव्हा तुम्ही निसर्गातील अशा सुंदर ठिकाणी जाऊ शकाल, तेव्हा एकत्र बसा आणि या वेळेची आठवण काढा, असे पत्नीसोबतचा हा सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना विराटने म्हटले आहे.

5 / 7

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या क्रिकेट तसेच चित्रपटांचे चित्रिकरण बंद असल्याने विराट आणि अनुष्का सध्या एकमेकांसोबतच मुंबईमध्ये आहेत.

6 / 7

कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे पुढचे काही दिवस तरी भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे विराटला अजून काही काळ तरी सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.

7 / 7

मात्र या सुट्टीच्या दिवसांमध्येही विराट कोहली आपल्या तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देत आहे. तसेच घरातच जिममध्ये वर्क आऊट करत आहे.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माकोरोना वायरस बातम्याआंतरराष्ट्रीय क्रिकेटबॉलिवूड