ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. १९८६ मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेला उस्मान ख्वाजा वयाच्या चौथ्या वर्षी आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला गेला होता.
उस्मान ख्वाजा याची सुरुवातीची कारकिर्द बरीच चांगली राहिली. परंतु कालांतराने ख्वाजा कायम वादग्रस्त होता. अनेक वादात ख्वाजा यांच नाव अडकले होते. आता निवृत्ती जाहीर करता करताही त्याने नवीन वादाला तोंड फोडले आहे.
उस्मान ख्वाजा त्याच्या निवृत्तीच्या घोषणेसोबात आणखी एका वादात अडकला आहे. माध्यमांशी बोलताना ख्वाजा म्हणाला, मला नेहमीच थोडे वेगळे असल्याचे वाटते. आणि अजूनही वाटते. मला ज्या पद्धतीने वागवले गेले आहे, ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या आहेत, त्यामुळे मला खूप वेगळे असल्याची जाणीव झाली असं तो म्हणाला.
उस्मान ख्वाजा करिअरच्या शेवटच्या टप्प्यात एका पाठोपाठ एक वादात अडकत गेला. त्याने एशेज सीरिजच्या पहिल्या टेस्टनंतर पर्थ पिचवर टीका केली होती. जी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला त्याची टीप्पणी रुचली नाही आणि त्यांनी या टीकेबाबत ख्वाजा याच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते.
२०२५-२६ एशेज सीरिज सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टीम जोरदार तयारी करत होती. दोन्ही टीमसाठी ही सीरीज ट्रॉफी खूप महत्त्वाची होती. मात्र तरीही मॅच सुरू होण्यापूर्वी ख्वाजा पहिले ३ दिवस गोल्फ खेळताना दिसून आला. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला पाठीची दुखापत झाली, त्यामुळे खूप वाद झाला.
आयसीसीकडून बुटावर मेसेज लिहिण्याची परवानगी मिळाली नाही तेव्हा उस्मान ख्वाजाने त्याचा विरोध करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानविरोधी सामन्यात हातावर काळी पट्टी बांधून ख्वाजा मैदानात उतरला आणि आयसीसीचा निषेध केला.
उस्मान ख्वाजाची ही वर्तवणूक आयसीसीला आवडली नाही आणि त्यांनी ख्वाजा याला इशारा दिला. त्यामुळे पुढच्या कसोटी सामन्यात त्याने काळी पट्टी न घालता मैदानात उतरला.
उस्मान ख्वाजाला एका कसोटी सामन्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बूट घालायचे होते. २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला 'सर्वांचे जीवन समान आहे' असे लिहिलेले बूट घालायचे होते. मात्र आयसीसीने याला परवानगी दिली नाही.
उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू होता. कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत संयमी, तांत्रिकदृष्ट्या मजबूत फलंदाज म्हणून त्याची ओळख होती. विशेषतः ओपनिंग फलंदाज म्हणून मोठ्या धावा करण्यासाठी तो प्रसिद्ध होता. भारत, इंग्लंडसारख्या कठीण दौऱ्यांवरही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली.
उस्मान ख्वाजाने ८७ कसोटी सामने खेळले, त्यात १६ शतके आणि २८ अर्धशतके अशी कामगिरी केली. त्याशिवाय ४० एकदिवसीय सामने खेळले त्यात २ शतके आणि १२ अर्धशतके खेळली. टी-२० च्या ९ सामन्यात त्याने १ अर्धशतक केले होते.