श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल आणि अँजेलो मॅथ्यूजची शतके हे भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले.
शतक साजरे केल्यानंतर अभिवादन करताना अँजेलो मॅथ्यूज.
शतक पूर्ण झाल्यानंतर दिनेश चंडिमलने असा जल्लोष केला.
चंडिमल आणि मॅथ्यूजच्या दमदार फलंदाजीमुळे श्रीलंकेच्या पाठिराख्यांना जल्लोष करण्याची संधी मिळाली.
रवीचंद्रन अश्विनने भेदक गोलंदाजी करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.
आता सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेची शेवटची विकेट झटपट घेण्याचे आव्हान भारतासमोर असेल.