Join us

कराची, लाहोरच्या स्टेडिअमवर इतर सर्व देशांचे झेंडे, पण भारताचा नाही; पाकिस्तानच्या कुरघोडी सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:13 IST

Open in App
1 / 6

चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यास जाणार नसल्याने पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. भारतीय संघाला पाकिस्तानात खेळवून पाकिस्तानसा पैसा कमवायचा होता. त्यावर पाणी फिरले आहे. आता भारतीय संघ पाकिस्तानात खेळत नसल्याने पाकिस्तानने भारताचा झेंडा कराची आणि लाहोरच्या स्टेडिअमवर लावलेला नाही. यामुळे पाकिस्तानला भारताचा किती द्वेष आहे, हे दिसत आहे.

2 / 6

पाकिस्तानला भारताच्या संघामुळे येणारा पैसा हवा आहे, परंतू भारतीय झेंडा नको आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअम आणि कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर भारताचा झेंडा लावण्यात आलेला नाही. चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये जेवढे देश खेळत आहेत, त्या इतर देशांचा झेंडा लावण्यात आला आहे.

3 / 6

भारत सर्व सामने हे दुबईमध्ये खेळणार आहे. यामुळे पाकिस्तानने झेंडा लावलेला नाही, असे मानले जात आहे. पाकिस्तानमध्ये अद्याप काही स्टेडिअमचे काम सुरु आहे. याचेही व्हिडीओ येत आहेत. पाकिस्तानात फक्त पहिल्या फेरीतील सामने होणार आहेत. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानने याला विरोध केला होता.

4 / 6

भारतीय संघ नसेल तर या स्पर्धेला काही अर्थ नाही हे आयसीसीला माहिती आहे. यामुळे आयसीसीने हायब्रिड मॉडेलमध्ये ही स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये गेला तर ते देखील सामने हे दुबईला होणार आहेत. यामुळे पाकिस्तानची आगपाखड होत आहे.

5 / 6

यजमानपद आहे पण नावालाच, कारण सेमी आणि फायनल जर देशाबाहेर होत असेल तर त्या यजमानपदाला उपयोग काय, असा सवाल क्रिकेटजगतात उपस्थित केला जात आहे. यावरूनही पाकिस्तानची खिल्ली उडविली जात आहे. यामुळे पाकिस्तान भारताविरोधात अशा कुरघोडी करत आहे.

6 / 6

आयसीसी आणि पाकिस्तानच्या पीसीबीमध्ये एक समझोता झाला आहे. यानुसार पाकिस्तान देखील भारतात ज्या आयसीसीच्या स्पर्धा असतील त्या भारतात खेळणार नाहीय. यामुळे या दोन्ही देशांचे शत्रूत्व असेच कायम राहणार आहे.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ