टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यातील चुरशीच्या लढतीत 7 धावांनी विजय मिळवला. अत्यंत अटीतटीचा झालेला हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पाहण्याचा योग क्रिकेटप्रेमींना लाभला.
इंग्लंडच्या बाजुने सॅम करणने 95 धावांची खेळी करत जोरदार लढत दिली. मात्र, सॅमची खेळी इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकली नाही. भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूरने जबरदस्त गोलंदाजी केली
सलामीवीर शिखर धवन, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत व अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीनंतर भुवनेश्वर कुमार (३-४२) व शार्दूल ठाकूरच्या (४-६७) यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने रविवारी येथील गहुंजे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या व निर्णायक लढतीत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला.
तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत २-१ अशी सरशी साधली. यापूर्वी कसोटी व टी-२० मालिका जिंकणाऱ्या यजमान भारतीय संघाने वन-डे मालिकेतही विश्वविजेत्या संघाचा पराभव करीत वर्चस्व गाजवले.
तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत २-१ अशी सरशी साधली. यापूर्वी कसोटी व टी-२० मालिका जिंकणाऱ्या यजमान भारतीय संघाने वन-डे मालिकेतही विश्वविजेत्या संघाचा पराभव करीत वर्चस्व गाजवले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव ४८.२ षटकांत ३२९ धावांत संपुष्टात आला, पण गोलंदाजांनी अचूक मारा करीत प्रतिस्पर्धी इंग्लंडचा डाव ५० षटकांत ९ बाद ३२२ धावांत रोखला.
इंग्लंडतर्फे सॅम कुरेन (नाबाद ९५, ८३ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार) व डेव्हिड मलान (५०) यांनी झळकावलेली अर्धशतके अखेर व्यर्थच ठरली. सॅम कुरेन आठव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर आणि देशभरात फटाके फुटले. टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष गावागावात, घराघरात पहायला मिळाला. एकीकडे होळीच्या सणामुळे वातावरण आनंदीत होते.
भारताच्या विजयामुळे हा आनंद द्विगुणीत झाला, त्यामुळेच सोशल मीडियावरही टीम इंडियाचं आणि विराट कोहलीचं हटके अभिनंदन झालं. अनेकांनी कोहली आणि होलीचा योग दाखवून दिला.
टीम इंडियाचा माजी गोलंदाज इराफन पठाणनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय संघाच्या विजयाचं अभिनंदन केलंय. तसेच, कोहली आणि होलीचा योग चांगला असल्याचं म्हटलंय.
बुरा न मानो होली है, जितनेवाली टीम का कप्तान कोहली है... असे ट्विट करत इरफान पठाणने इंग्लंडच्या संघाला सहानुभूती देण्याचा प्रयत्न केलाय. तर, विराट कोहलीच्या कर्णधार पदाचेही अभिनंदन केलंय.
देशभरात होळीच्या सणाचा उत्साह दिसून येत आहे, मात्र कोरोनाचं सावट असल्याने सोशल मीडियातूनची होळीच्या शुभेच्छांवर भर आहे.