Join us

Most Wickets In Asia Cup: आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप १० मध्ये २ भारतीय गोलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 20:24 IST

Open in App
1 / 10

आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन सर्वात टॉपला आहे. त्याने २ सामन्यात ३० विकेट्स घेतल्या आहेत.

2 / 10

भेदक यॉर्करनं प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला गुडघे टेकायला लावणाऱ्या श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा याने आपल्या कारकिर्दित १४ सामन्यात २९ विकेट्स घेतल्या आहेत.

3 / 10

श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर अजिंता मेंडिस याने फक्त ८ सामन्यात २६ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

4 / 10

पाकिस्तानच्या सईद अजमल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. आशिया कप स्पर्धेत १२ सामन्यात त्याच्या खात्यात २५ विकेट्स जमा आहेत.

5 / 10

रवींद्र जडेजा या यादीत टॉप ५ मध्ये आहे. त्याने आशिया कप स्पर्धेतील २० सामन्यात २५ विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत.

6 / 10

स्विंगचा बादशहा अशी ओळख निर्माण करून आपली कारकिर्द गाजवणाऱ्या श्रीलंकेच्या चांमिंडा वास याने आशिया कप स्पर्धेत १९ सामन्यात २३ विकेट्स घेतल्या आहेत.

7 / 10

या यादीत भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणचाही समावेश आहे. त्याने २००४ ते २०१२ या कालावधीत १२ सामन्यात २२ विकेट्स घेतल्या आहेत.

8 / 10

स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्यानं २५ सामन्यात २२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

9 / 10

बांगलादेशच्या अब्दुर रज्जाक राज यानं आशिया कप स्पर्धेत १८ सामन्यात २२ विकेट्स मिळवल्या आहेत.

10 / 10

बांगलादेशचा स्टार ऑलराउंडर शाकिब अल हसन याने १८ सामन्यात २२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध श्रीलंकाभारत विरुद्ध पाकिस्तानइरफान पठाणरवींद्र जडेजा