Join us

PHOTOS : अथिया-राहुलच्या लग्नाचा पहिला वाढदिवस; अखेर ते फोटो समोर, पाहा झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 11:00 IST

Open in App
1 / 9

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय संघाचा खेळाडू लोकेश राहुल यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. हे दोघे जानेवारी २०२३ मध्ये विवाहबंधनात अडकले.

2 / 9

खंडाळा येथील फार्महाउसवर त्यांनी सातफेरे घेतले. आता मुंबईतील एका रेस्टॉरंटमधील त्यांचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ते लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसते.

3 / 9

रेस्टॉरंटच्या अधिकृत इंन्स्टाग्रामवर अथिया आणि लोकेश राहुलच्या कँडललाइट डिनरची झलक पाहायला मिळाली. कपलने शेफ आणि टीमसोबत पोज देताना क्लिक केलेले फोटो दिसत आहेत. तसेच ते जेवणाचा आस्वाद घेत आहेत.

4 / 9

अथिया शेट्टी आणि लोकेश राहुल यांनी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. अखेर १८ जून रोजी रेस्टॉरंटने या जोडप्याच्या रोमँटिक सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

5 / 9

'ही आठवण आता खासगीमध्ये अर्थात सर्वांपासून दूर ठेवू शकत नाही. आमच्या लाडक्या अथिया शेट्टी आणि लोकेश राहुल यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज डिनरची ही एक झलक', असे रेस्टॉरंटने पोस्ट केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये नमूद आहे.

6 / 9

पहिल्या फोटोत अथिया आणि राहुल कँडललाइट डिनर दरम्यान कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. एका फोटोत हे कपल शेफच्या टीमसोबत उभे आहे आणि कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.

7 / 9

अथियाने यातील एक फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीवर ठेवून २३ जानेवारी २०२४ अशी तारीख लिहिली आहे. एकूणच लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी काढलेले हे फोटो असल्याचे तिने स्पष्ट केले.

8 / 9

अथिया आणि राहुल यांनी २३ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी जोडप्याने एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला होता.

9 / 9

टॅग्स :लोकेश राहुलअथिया शेट्टी भारतीय क्रिकेट संघसेलिब्रिटीऑफ द फिल्ड