भारतीय क्रिकेटपटू आणि त्याची गर्लफ्रेंड यांची पहिली भेट कॉलेजमध्येच झाली.
या क्रिकेटपटूने गर्लफ्रेंडला प्रपोज केले. पण त्याला उत्तर मिळायला तब्बल पाच वर्षे लागली.
पाच वर्षांनंतर या दोघांनी आपली ही प्रेमकहाणी सर्वांसमोर आणली.
या दोघांनी आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली.
प्रेमाची कबुली दिल्यावर या दोघांनी आपल्या कुटुंबियांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांचा साखरपुडा पार पडला.
ही प्यारवाली लव्हस्टोरी आहे भारताचा यष्टीरक्षक संजू सॅमसन आणि त्याची गर्लफ्रेंड चारुलता यांची.
आज सॅमसनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ही गोष्ट आज सर्वांपुढे आली आहे.