टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाच्या पत्नीच्या सौंदर्यासमोर मोठमोठ्या अभिनेत्री फेल, पाहा खास फोटो

Manish Pandeys Wife: धडाकेबाज फलंदाज मनीष पांडे गेल्या काही काळापासून भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. मात्र तो पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याने दक्षिण भारतीय अभिनेत्रीसोबत विवाह केला आहे.

धडाकेबाज फलंदाज मनीष पांडे गेल्या काही काळापासून भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. मात्र तो पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याने दक्षिण भारतीय अभिनेत्रीसोबत विवाह केला आहे.

भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडेने २ डिसेंबर २०१९ रोजी दक्षिण भारतीय अभिनेत्री आश्रिता शेट्टी हिच्यासोबत विवाह केला होता. आश्रिता शेट्टी दक्षिण भारतीय सिनेमांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

मनीष पांडे आणि आश्रिता शेट्टी यांनी एकमेकांना बरीच वर्षं डेट केलं होतं. बरीच वर्ष चाललेल्या रिलेशनशिपनंतर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला होता.

मनीष पांडेची पत्नी आश्रिता शेट्टी २०१० मध्ये क्लीन अँड क्लीअर फ्रेश फेस ब्युटी कॉन्टेस्टमधील विजेती राहिलेली आहे.

आश्रिता शेट्टीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात उदयम एनएच ४ मधून केली होती. आश्रिता शेट्टीने इंद्रजित, ओरू कन्नयम मुनू कलावानिकलम सारख्या चित्रपटामधून काम केलं आहे. आश्रिता शेट्टी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

मनीष पांडेने टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध २३ जुलै २०२१ रोजी खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतीय संघाकडून २९ वनडे आणि ३९ टी-२० सामने खेळले होते. मनीष पांडे आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.