कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत बांगलादेशने इतिहास घडवला आहे.
आपल्या दमदार फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना जेरीस आणणारे मॅट रेनशॉ, उस्मान ख्वाजा आणि स्टिव्ह स्मिथ सारखा चिवट फलंदाजी करणारा कर्णधार डावात असतानाही बलाढ्य ऑस्ट्रेलिया बांगलादेशच्या फिरकीपटूंनी इतिहास घडविला
एका बाजुने डेव्हिड वॉर्नरसारखा धडाकेबाज फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजाना दणक्यात टोलवत होता आणि दुसºया बाजूने एकापाठोपाठ एक सगळेच तंबूत परतत होते अशी केविलवाणी स्थिती ऑस्ट्रेलियाची झाली होती.
बांगलादेशने ऑस्ट्रेलियासमोर 265 धांवाचे माफक आव्हान ठेवले होते. शिवाय अखेरचे दोन-अडीच दिवसही ऑस्ट्रेलियाच्या हाती होते. पण, एवढी धावसंख्याही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पार करता आली नाही.
शाकिब अल हसन आणि तैजूल इस्लाम यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा निभाव लागला नाही. चौथ्या दिवशी विजय मिळवता मिळवता 20 धावांनी टीम ऑस्ट्रेलिया ढेर झाली.
पहिल्या डावात 68 धावा देऊन पाच गडी बाद करणाºया शाकीबने दुसºया डावात 85 धावा देऊन अर्धा ऑस्ट्रेलिया संघ तंबूत धाडला. तैजूलने 60 धावा देत तीन गडी बाद केले तर ऑफ स्पिनर मेहदी हसन मिराजने 80 धावा देत दोन विकेट काढल्या. या तिघांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरोधात आतापर्यंत झालेल्या पाच कसोटी सामन्यांतील पहिला विजय मिळवला आहे.