T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारे ६ धुरंधर! आघाडीच्या ३ मध्ये २ भारतीय, पण...

या यादीत हिटमॅन रोहित टॉपला होता, पण आता त्याची जागा पाकिस्तानच्या बाबर आझमनं घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या ६ फलंदाजांमध्ये रोहित शर्मा अव्वलस्थानावर आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीचा नंबर लागतो. दोघांनी २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बाबर आझम अव्वलस्थानी पोहचला आहे. पाकिस्तानच्या बॅटरनं १३० सामन्यातील १२३ व्या डावात ४२३४ धावा केल्या आहेत. रोहित शर्माला मागे टाकून तो नंबर वन बनला आहे.

बाबर आझमनं आतापर्यंतच्या आपल्या टी-२० कारकिर्दीत ३ शतके आणि ३६ अर्धशतके झळकावली आहेत. १२२ ही त्याची आंतरारष्ट्रीय टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तो फॉर्ममध्ये दिसत नाही. विश्वविक्रमी कामगिरीनंतर आशिया कप स्पर्धेतून संघाबाहेर काढलेल्या बाबरला आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाक संघात स्थान मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.

रोहित शर्मानं २००७ ते २०२४ दरम्यानच्या T20I कारकिर्दीत १५९ सामन्यातील १५१ डावात सर्वाधिक ५ शतके आणि ३२ अर्धशतकाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ४२३१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. नाबाद १२१ धावा ही हिटमॅनची छोट्या फॉरमॅटमधील सर्वात मोठी खेळी आहे. टी-२० सह कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर तो फक्त वनडेतच सक्रीय आहे.

रनमशिन विराट कोहलीनं २०१० ते २०२४ या टी-२० कारकिर्दीत १२५ सामन्यातील ११७ डावात ४१८८ धाावा काढल्या आहेत. सर्वाधिक ३८ अर्धशतकासह कोहलीच्या भात्यातून या फॉरमॅटमध्ये एक शतक पाहायला मिळाले आहे. नाबाद १२२ ही कोहलीची आंतरराष्ट्रीय टी-२० मधील सर्वोच्च धावंसख्या आहे.

इंग्लंडच्या जोस बटलरनं आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये २०११ ते २०२५* या कालावधीत १४४ सामन्यातील १३२ डावात ३८६९ धावा काढल्या आहेत. त्याने आतापर्यंत एका शतकासह २८ अर्धशतके झळकावली असून नाबाद १०१ ही बटलरची आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावंसख्या आहे.

आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग हा आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आघाडीच्या ५ फलंदाजांमध्ये आहे. आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने १ शतक आणि २४ अर्धशतकाच्या मदतीने ३७१० धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर आणि स्फोटक बॅटर मार्टिन गप्टिल याने २००९ ते २०२२ या कालावधीत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १२२ सामन्यातील ११८ डावात २ शतके आणि २० अर्धशतकाच्या मदतीने ३५३१ धावा केल्या आहेत.