Join us
Daily Top 2Weekly Top 5

Athiya Shetty-KL Rahul's Wedding: कॉमन फ्रेंडद्वारे पहिली भेट, स्टेडियमध्येही साथ; जाणून घ्या केएल राहुल अन् अथियाची प्रेमकहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 10:00 IST

Open in App
1 / 12

भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा आज विवाह होणार आहे. खंडाळ्यातील फॉर्म हाऊसमध्ये दोघांचे लग्न होणार असून, या लग्न समारंभाला बॉलिवूड आणि देशातील बडे व्यक्ती हजेरी लावणार आहेत. केएल राहुल आणि अथिया दोघेही गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांच्या रिलेशनशीपटी चर्चा सोशल मीडियावर होती, अखेर आज ही जोडी लग्नबंधणात अडकणार आहे.

2 / 12

अनेकवेळा या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याआधीही त्यांच्या लव्हस्टोरीच्या अफवा पसरल्या होत्या.

3 / 12

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यावेळी या दोघांच्यात पहल्यांदा संभाषण झाले होते. यानंतर दोघांची मैत्री सुरू झाली. पुढ दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही नेहमीच चर्चेत असतात, पण असे असतानाही दोघांनीही आपले नाते गुपित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रिलेशनशिपमध्ये असूनही, दोघेही जवळपास दीड वर्ष एकमेकांसोबत कधीही दिसले नाहीत, दोघांनी कधीही एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीत.

4 / 12

18 एप्रिल 2020 रोजी अथियाने केएल राहुलला त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. अथियाने दोघांच्या गोंडस फोटोसह लिहिले - हॅपी बर्थडे माय पर्सन.

5 / 12

२०२१ मध्ये अथियाने राहुलला दुसऱ्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी या दोघांच्या नात्याची अफवा सुरू झाल्या. राहुलचा एकत्र फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या, अथियाच्या या फोटोवर कमेंट करताना तिचे वडील सुनील शेट्टी यांनीही कमेंट ेकली होती.

6 / 12

3 जून 2021 रोजी, KL राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी साउथहॅम्प्टन, इंग्लंडला गेला, जिथे त्याचा सामना एगेस बाउल स्टेडियमवर होणार होता. केएल राहुलने इंग्लंडमधील अनेक फोटो शेअर केली होती. या फोटोंची बॅकग्राउंड अथिया शेट्टीने शेअर केलेल्या फोटोंसारखीच होती, या फोटोमुळेही दोघांच्या चर्चा सुरू झाल्या.

7 / 12

अथिया शेट्टीने जून २०२१ मध्ये इन्स्टाग्रामवर लव्हेडर कलरच्या फुलांचा फोटो शेअर केला होता. काही वेळानंतर त्याच फुलांसोबत केएल राहुलने एक फोटो शेअर केला होता, या फोटोमुळे दोघही एकत्र असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

8 / 12

काही दिवसांनंतर, अथियाने स्वतःचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला, या फोटोत बॅकग्रउंड पांढरी रेलिंग दिसत होती. याच बॅकग्राउंडमध्ये केएल राहुलनेही फोटो शेअऱ केला होता. या फोटोंनाही चाहत्यांनी दोघांच्या कमेंट सेक्शनमध्ये एकमेकांच्या नावाने त्यांना खूप ट्रोल केले होते.

9 / 12

तर दुसऱ्या काही फोटोंमध्ये एका मुलीचा फोटो दिसत आहे. या मुलीचा फोटो केएल राहुल आणि अथिया या दोघांच्या फोटोत दिसत आहे. या फोटोमुळे केएल राहुल आणि अथिया शेट्टी रिलेशनशीप मध्ये असल्याचा दावा अनेक नेटकऱ्यांनी केला.

10 / 12

रिलेशनशिपच्या अफवांच्या दरम्यान, केएल राहुलने अथियाला 5 नोव्हेंबर 2021 रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या पोस्टमध्ये दोघांचे एकत्र फोटो हेते.

11 / 12

२०२१ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनसाठी फिनालेमध्ये कएअल राहुलसोबत अथिया शेट्टी गेली होती. यावेळी ऑफिशीयल कादगपत्रांमध्ये राहुलने अथिया शेट्टीचे नाव लिहिले होते. यानंतर त्यांच्या लव्हस्टोरीवर नेटकऱ्यांनी शिक्कामोर्तब केला होता.

12 / 12

या अफवा सुरू असताना केएल राहुलचे अनेक फोटो समोर आले होते. कधी अथिया मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली तर कधी सुट्टीत दोघेही एकमेकांसोबत स्पॉट झाले. हे दोघे पहिल्यांदा अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टीच्या तडप चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दिसले होते. यावेळी त्यांच्यासोबत सुनील शेट्टीही होते.

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुलबॉलिवूडऑफ द फिल्ड
Open in App