आशिया चषक स्पर्धेसाठी ( Asia Cup 2022) निवडला जाणारा संघच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ( T20 World Cup) खेळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने सीनियर्स खेळाडूंना जबाबदारीने वागण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. निवड समितीने विराट कोहलीच्या फॉर्मविषयी BCCIची चर्चा केल्याचेही समोर येत आहे.
भारताचा माजी कर्णाधाराला वेस्ट इंडिज विरुद्धच्या ट्वेंटी-२० व झिम्बाब्वे विरुद्धच्या वन डे मालिकेतही विश्रांती दिली गेली आहे. विराटने निवड समितीला तो आशिया चषक स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. विराट कोहलीचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय आहे. अडीच वर्षांत विराटची गाडी ७०व्या आंतरराष्ट्रीय शतकापर्यंतच अडकली आहे. इंग्लंडविरुद्धच्या वन डेतही विराटला फार चांगली कामगिरी करता आली नव्हती. ३३ वर्षीय विराटने इंग्लंड दौऱ्यावर ७६ धावाच केल्या
त्यामुळे तो फॉर्मात येणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे. आशिया चषकमध्ये त्याची कामगिरी समाधानकारक न झाल्यास BCCI व निवड समिती काही कठोर निर्णयही घेऊ शकतात. दीपह हुडा सध्या विराटला रिप्लेस करण्यासाठी शर्यतीत आहे.
''विराट कोहलीने निवड समितीशी चर्चा केली आणि आशिया चषक स्पर्धेसाठी ते उपलब्ध असल्याचे कळवले आहे. भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना आशिया चषक स्पर्धेत विश्रांती दिली जाणार नाही आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा संपेपर्यंत त्यांना विश्रांती दिली जाणार नाही. विंडीज मालिकेनंतर दोन आठवड्यांचा विश्रांतीचा काळ प्रमुख खेळाडूंना मिळणार आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी PTI ला सांगितले.
झिम्बाब्वे दौऱ्यावरील वन डे मालिकेत विराट कोहलीचे पुनरागमन होईल, अशी शक्यता होती. पण, वर्कलोड मुळे त्याच्यासह काही सीनियर्संना विश्रांती दिली गेली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये दुखापतीतून सावरलेल्या दीपक चहरचं पुनरागमन झालं आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार) ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर