Join us

Asia Cup Ind Vs Pak:मैत्री, आदर, मस्ती आणि ग्लॅमर! IND vs PAK सामन्यातील 'या' 5 फोटोंनी जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:46 IST

Open in App
1 / 5

खेळामध्ये जात, धर्म आणि पंथ यांना अजिबात थारा नसतो याचाच प्रत्यय भारत-पाकिस्तान सामन्यातून समोर आला आहे. तसेच खेळाला सीमा नसते आणि खेळाडूंचे चाहते सीमेपलीकडे असतात. विराट कोहलीचा एक पाकिस्तानी चाहता जेव्हा विराटची जर्सी घालून सामना पाहायला पोहोचला तेव्हा त्याने सर्वांचेच लक्ष वेधले. पाकिस्तानमधील या जबरा फॅनने भारतीयांचे देखील मन जिंकले. हा फोटो म्हणजे खेळ भावना काय असते याचे एक उत्तम उदाहरण आहे.

2 / 5

भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने विजय मिळवला. विजयी षटकार ठोकून हार्दिक पांड्याने भारताच्या विजयाचे खाते उघडले. सामना संपताच हार्दिक पांड्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची गळाभेट घेतली आणि खेळभावना दाखवून दिली. क्रिकेटचा खेळ असा आहे की खेळाडूंमध्ये विजय-पराजयाच्या पलीकडे एकमेकांबद्दल आदर असतो. पांड्या आणि कार्तिकचेही संपूर्ण पाकिस्तानी संघाने हस्तांदोलन करून आणि मिठी मारून अभिनंदन केले.

3 / 5

दुबईत झालेला हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये साऊथचा सुपरस्टार विजय देवराकोंडाचा देखील समावेश होता. स्टेडियममधील चाहत्यांसोबत त्याने देखील सामन्याचा आनंद घेतला. तसेच त्याने सामन्यापूर्वी इरफान पठाणसोबत खूप धमाल केली होती.

4 / 5

हार्दिक पांड्याने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 35 धावांच्या खेळीशिवाय त्याने 3 बळी पटकावून पाकिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली. विजयानंतर दिनेश कार्तिकने ज्याप्रकारे पांड्याचे अभिनंदन केले, ते पाहून चाहते कार्तिकचे कौतुक करत आहेत.

5 / 5

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू होते. पण पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, मात्र उर्वशी रौतेलाने सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. त्यामुळे दोघांवरून सोशल मीडियावर बरेच मीम्स व्हायरल होत होते.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानहार्दिक पांड्याविराट कोहलीदिनेश कार्तिक
Open in App