Join us

Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:25 IST

Open in App
1 / 9

ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये तीनवेळा लढत झाली होती. सुरुवातीला सुर्याने पाकिस्तानी गृहमंत्री, पीसीबी आणि आशिया क्रिकेटचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याशी हस्तांदोलन केल्याने देशातून मोठी टीका झाली होती. परंतू, सामन्यावेळी सुर्याने ती दुरुस्त केली आणि मोठ्या वादाला सुरुवात झाली होती.

2 / 9

या स्पर्धेत तीनवेळा भारत पाकिस्तान एकमेकांना भिडले. तिन्ही वेळा नो हँडशेक वाद रंगला होता. भारत-पाकिस्तान एकमेकांना विमाने कशी पाडली आणि विमानांनी हल्ले करून ती कशी परतली याचे हातवारे करून डिवचले जात होते. अशातच फायनलच्या पारितोषिक वितरणाने तर कहरच केला आहे.

3 / 9

भारतीय संघाने पाकिस्तानी गृहमंत्री नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. यामुळे नकवी हे भारताने जिंकलेली ट्रॉफी आणि पदके घेऊन हॉटेलला पळून गेले आहेत. यावरून आता वाद सुरु झाला आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनी ही चोरी म्हटली आहे, तर पाकिस्तानी मीडियाने या घटनेला वेगळ्या नजरेतून पाहिले आहे.

4 / 9

डॉन न्यूजचे क्रीडा प्रमुख अब्दुल गफ्फार यांनी नक्वी यांच्या 'दबंग' असा ट्रॉफीच्या अनावरणाचा व्हिडिओ पोस्ट केला, जो स्पर्धेपूर्वी सकारात्मक प्रतिसाद मिळवत होता. अंतिम सामन्यानंतर डॉनने यावर जास्त भडक भुमिका घेतली नाही. कमीत कमी उल्लेख करत पाकिस्तान लढल्याकडे लक्ष केंद्रीत करत नकवींच्या बाजुने किंवा विरोधात जास्त लिहिण्यात आलेले नाही.

5 / 9

तर इतर माध्यमांनी पाकिस्तानी नकवींच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यावर टीका करताना नकवी यांनी त्यांच्या अधिकाराचा योग्य वापर केल्याचे म्हटले आहे. जिओ न्यूजने “ट्रॉफी वाद! विजयानंतर भारताचे नवे नाटक” असे म्हटले आहे. तसेच हा पाकिस्तानचा विजय आहे. भावना दुखावल्या गेल्या तरी, आता लक्ष संघाच्या कामगिरीवर केंद्रित केले पाहिजे, असे म्हणत ट्रॉफी हॉटेलला नेल्याचा उल्लेख टाळला आहे.

6 / 9

एआरवाय न्यूजने आशिया कपच्या यशात नक्वीच्या भूमिकेबद्दल अंतिम फेरीपूर्वीचा प्रचार; अंतिम फेरीनंतर, ट्रॉफी सेरेमनीतील व्यत्ययांबद्दल भारतावर दोषारोप केले आहेत. तसेच नकवींवर कोणतीही टीका न करता भारताने राजकारण आणल्याचा आरोप केला आहे.

7 / 9

एक्सप्रेस ट्रिब्यून / पीटीव्हीने भारताच्या बहिष्काराच्या धमक्यांना न जुमानता 'आशिया कप आयोजित केल्याबद्दल' नकवींचे कौतुक केले आहे. परंतु ट्रॉफीच्या वादाकडे दुर्लक्ष करून भविष्यातील दौऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

8 / 9

सामा टीव्हीने आधीपासूनच्या वादावर चर्चा केली आहे. नजम सेठी सारख्या टीकाकारांचे उद्धरण दिले परंतु नक्वी यांना निर्णायक म्हणून संबोधले. तसेच भारतीय संघाने नकारात्मक खेळाचे प्रदर्षशन करत राजकारण केले आहे, क्रिकेटमध्ये राजकारण ओढत आहे, अशी टीका केली आहे.

9 / 9

पाकिस्तानी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी चोरली नाही, असेच म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. या नकारानंतर, गोंधळ निर्माण झाला आणि ट्रॉफी सादरीकरण समारंभातून बाजुला नेण्यात आल्याचे पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे. आघाडीच्या उर्दू वृत्तपत्रे 'डेली जंग' आणि 'एक्सप्रेस न्यूज' ने याला 'भारतीय संघाचा हट्टीपणा' असे वर्णन केले.

टॅग्स :आशिया कप २०२५भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानसूर्यकुमार यादव