काल रात्री झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावंनी दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेचे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील हे सहावे विजेतेपद आहे. अंतिम सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत श्रीलंकेला विजेतेपदाकडे नेण्यामध्ये या खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली.
अंतिम सामन्यात भानुका रजपक्षे श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने निम्मा संघ माघारी परतल्यानंतर नाबाद ७१ धावांची खेळी करत संगाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या वनिंदू हसरंगाने फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही कमाल दाखवली. त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये ३ बळी मिळवले. त्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
वेगवान गोलंदाज चमिका करुणारत्ने याने भानुका राजपक्षेसह नाबाद अर्धशतकी भागीदारीनंतर गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या चमिका करुणारत्ने याने ३३ धावात २ बळी टिपले.
पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात पथुम निसांका लवकर बाद झाला. मात्र संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात त्याची भूमिका निर्णायक ठरली. निसंकांने आशिया चषक स्पर्धेतील ६ सामन्यात १७३ धावा फटकावल्या. यादरम्यान, त्याने दोन अर्धशतकेही फटकावली.
यष्टीरक्षक कुशल मेंडिस हा सुद्धा अंतिम सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. मात्र त्याने आशिया चषक स्पर्धेतील सहा सामन्यात १५६ च्या स्ट्राइक रेटने १५५ धावा फटकावल्या.
श्रीलंकेचा कर्णधार दासून शणाका यानेही स्पर्धेत संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. शणाकाने ६ सामन्यात १११ धावा फटकावल्या. ज्यामध्ये ४५ त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.
गेल्या काही काळात राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असलेल्या श्रीलंकेसाठी मैदानात उतरलेले ११ खेळाडू नायक ठरले. त्यांनी पाकिस्तानला पराभूत करून देशवासियांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळवून दिली.