Join us  

Asia Cup 2022: भारतीय संघाचा थाट! दुबईत दिवसाला ५० हजार भाडं असलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 6:07 PM

Open in App
1 / 5

आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग व अफगाणिस्तान या संघांची वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सोय करण्यात आली आहे. भारतीय संघ दुबईच्या Palm Jameirah Resortमध्ये मुक्कामाला आहे.

2 / 5

Palm Jameirah Resort मध्ये मनोरंजनाची उणीव खेळाडूंना भासणार नाही. हॉटेलच्या आतमध्ये थ्री डी, फोरडीएक्स थिएटर आहेत. शॉपिंग करण्यासाठी रेसॉर्टच्या आतमध्येच दुकानं आहेत. रेसॉर्टमधून संपूर्ण शहराचा विलोभनीय नजारा पाहायला मिळतो.

3 / 5

Palm Jameirah Resort हे जगातील आलिशान हॉटेल्सपैकी एक आहे. Palm Jameirah Resortजवळ समुद्र किनारा आहे. भारतीय संघा व्यतिरिक्त अन्य संघांना बिझनेस बे हॉटेलमध्ये थांबवण्यात आले आहे.

4 / 5

Palm Jameirah Resort मध्ये एका दिवसाचं किमान भाडं ३० हजार इतके आहे आणि सीजनमध्ये हे भाडं ५० ते ८० हजार प्रती दिवस इतके वाढते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानही भारतीय संघ याच हॉटेलमध्ये मुक्कामाला होता.

5 / 5

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंह, आवेश खान.

टॅग्स :एशिया कप 2022भारतीय क्रिकेट संघदुबईऑफ द फिल्ड
Open in App