Asia Cup 2022 : कहानी मै ट्विस्ट! Deepak Chahar च्या माघारीच्या वृत्तावर BCCI चं काही वेगळंच म्हणणं...

Asia Cup 2022 : जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल या दोन प्रमुख गोलंदाजांनी दुखापतीमुळे आधीच आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Asia Cup 2022 : जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल या दोन प्रमुख गोलंदाजांनी दुखापतीमुळे आधीच आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना संघासोबत दुबईत जाता आले नाही. त्यात दीपक चहरने ( Deepak Chahar) दुखापतीतून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले होते, परंतु BCCI चे याबाबत काही वेगळेच म्हणणे आहे.

चहरच्याजागी २५ वर्षीय कुलदीप सेन याची निवड केली गेल्याचे वृत्त दैनिक भास्करने दिले होते. यात त्यांनी कुलदीपचा भाऊ व प्रशिक्षकांचा हवाला दिला होता. कुलदीप स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून व आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सने २० लाखांत कुलदीपला आपल्या ताफ्यात घेतले. त्याने ७ सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या

फेब्रुवारी २०२२नंतर दीपक चहरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएल २०२२लाही मुकावे लागले होते. दुखापतीतून सावरून त्याने झिम्बाब्वे दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन केले आणि चांगली कामगिरी करून दाखवली. पहिल्या वन डेत त्याने तीन विकेट्स घेताना मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कारही पटकावला.

भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग, आवेश खान; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल

पण, दीपक चहरला कोणतीही दुखापत झाली नसून तो संघासोबतच असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले. कुलदीप सेन याची नेट गोलंदाज म्हणून निवड झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ''ही अफवा आहे. चहर संघासोबत दुबईत आहे आणि त्याने काल सराव सत्रातही सहभाग घेतला. आजही तो सराव सत्रात सहभागी होणार आहे. तो तंदुरुस्त आहे. कुलदीप नेट गोलंदाज म्हणून सहभागी झाला आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी Insidesports ला सांगितले.