मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्या लेकाचा लग्नसोहळा अगदी थाटात माटात पार पडला. अर्जुन तेंडुलकर याने गुरुवारी सानिया चांडोक हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या वेडिंग लूकसह दोघांना आशीर्वाद देण्यासाठी लग्न समारंभात जोडीनं उपस्थितीत राहिलेल्या माजी क्रिकेटपटूंनीही स्टायलिश अंदाजाने सर्वांचे लक्षवेधून घेतले.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या लग्नात अनेक क्रिकेटर्संनी हजेरी लावली होती. महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनी यांनी आपल्या खास स्टायलिश लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.
धोनी आणि त्याची पत्नी साक्षी दोघांनी बेज आणि क्रीम रंगाच्या आउटफिटमध्ये परफेक्ट फॅशनचा खास नजारा दाखवून दिला. साक्षीच्या अनारकली ड्रेसमधील परफेक्ट लूकसह धोनीची पारंपारिक अदाजातील खास झलक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
हरभजन सिंग आणि गीता बसरा या जोडीनंही आपल्या फॅशनचा जलवा दाखवून दिली. भज्जीनं पांढर्या रंगाचा कुर्ता पायजमातील आउटफिट्समध्ये लूक परिपर्ण करण्यासाठी फ्लोरल डिटेलिंगच हाफ जॅकेट परिधान केले होतेत. त्याची पत्नी गीताने मॉडर्न ड्रेप साडीत परफेक्ट लूक मिळवला होता.
सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका या दोघांनीही लग्न समारंभात परफेक्ट मॅचिंगसह फॅशनचा जलवा दाखवून दिला. रैना साध्या कुर्ता-पायजम्यासह एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट घालून मिरवताना दिसला. तर त्याची पत्नी प्रियांकाने पांढऱ्या मोत्यांनी सजलेल्या शरारासह मैफील लुटली.
राहुल द्रविडही पत्नी विजेता पेंढारकर यांच्यासह या समारंभात आला होता. द्रविडनं शेरवानीसह तर त्याची पत्नी विजेता यांनी पिवळ्या रंगाच्या रेशमी साडीतील पारंपारिक अंदाज जपल्याचे पाहायला मिळाले.
युवराज सिंगने डार्क मरून आणि ग्रे शेडच्या पॅटर्नमधील अचकनमध्ये रॉयल लूक मिळवला होता. त्याची पत्नी हेजल हिने हेवी फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेली काळी साडी नेसून फॅशनेबल अंदाजात मिरवताना दिसली.
झहीर खान आणि सागरिका घाटगे जोडीनंही परफेक्ट लूकसह स्टायलिश अंदाज दाखवून दिला. माजी जलदगती गोलंदाजाने ऑल व्हाईट आउटफिट्सवरील ब्लू पर्पल शेड वेल्वे ब्लेझरसह फॅशनेबल लूक परिपूर्ण केला होता. सागरिकाने गोल्डन सिल्क साडीला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले.