KL Rahul Anushka Sharma Virat Kohli: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भारतातील एक पॉवर कपल मानलं जातं. या जोडीचा फिटनेस पाहून साऱ्यांनाच हेवा वाटतो. विराट अनुष्का दोन मुलांचे पालक असूनही त्यांचा फिटनेस कमालीचा आहे.
विराटच्या आयुष्यात अनुष्का येण्याआधीपासून विराट-केएल राहुल खूप चांगले मित्र आहेत. RCBमध्ये दोघे बराच काळ एकत्र खेळले आहेत. तसेच एकमेकांच्या सुख-दु:खातही ते एकमेकांना सपोर्ट करतात.
विराट आणि अनुष्का यांचं लग्न होण्याच्या आधीही अनुष्का क्रिकेटचे सामने पाहायला यायची. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात क्रिकेटर्स थांबलेल्या हॉटेलमध्ये अनुष्का आली होती. त्यावेळचा किस्सा राहुलने एका टॉक शो मध्ये सांगितला.
राहुल म्हणाला, 'अनुष्का आणि विराट २०१४ मध्ये एकमेकांना डेट करत होते. त्यावेळच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरची एक गोष्ट मला सगळ्यांना सांगाविशी वाटते. तेव्हा माझ्या फलंदाजीचा बॅड पॅच सुरु होता.'
'ऑस्टेलियात मेलबर्नला आम्ही एका हॉटेलात होतो. मी माझ्या बॅटिंग फॉर्मच्या चिंतेमुळे खूप दु:खी होतो. मी प्रचंड हताश झालो होतो हे माझ्या देहबोलीतून तिला आधीच दिसले होते. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट घडली.'
'विराट आणि अनुष्का दोघेही माझ्याशी खूप छान वागायचे. आमची खूप छान मैत्री होती. त्यादिवशी अनुष्का अचानक माझ्या रुममध्ये आली. मी माझ्या रुममध्ये एकटाच बसलो होतो.'
'अनुष्का मला म्हणाली- मी तुला इथे असं एकटं बसू देणार नाही, कारण तू खराब फॉर्मबद्दल विचार करुन त्रास करून घेशील. विराट आणि मी फार जेवायला चाललो आहोत, तुला आमच्या बरोबर यावंच लागेल'
'मी त्यांच्या डेटवर त्यांच्यासोबत गेलो. त्या दोघांनी मला त्यांच्या आयुष्यातील वाईट काळ आणि त्यावर केलेली मात याबद्दल सांगितले. त्यांच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं आणि नकारात्मकता कमी झाली.'
'आमच्या पुढच्या क्रिकेट मालिकेला बराच कालावधी होता. त्या मधल्या काळात विराट-अनुष्का कायम मला त्यांच्यासोबत जेवायला घेऊन जात होते. त्या दोघांनी मला खूप मदत केली आणि वाईट काळात सकारात्मक राहायला शिकवलं'