टीम इंडियाचा 'थ्री डी' मॅन आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी स्टार फलंदाज अंबाती रायडू आणि त्याची पत्नी चेन्नुपल्ली विद्या यांनी तिसऱ्या अपत्याचे स्वागत केले आहे.
अंबाती रायडूने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवजात बाळासोबत पत्नीचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत बाबा झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
भारतीय क्रिकेटरनं २००९ मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच चेन्नुपल्ली विद्या हिच्यासोबत लग्न केले होते.
अंबातीची पत्नी विद्या हिने २०२० मध्ये मुलगीच्या रुपात पहिल्या अपत्याला जन्म दिला होता. तिच नाव विविया असं आहे. १६ मे २०२३ रोजी अंबाती-विद्या दुसऱ्यांदा पालक झाले. त्यानंतर आता तिसऱ्यांदा ही जोडी आई-बाबा झाली आहे.
अंबाती रायडू सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा फॅमिलीसोबतचे खास फोटो शेअर करताना पाहायला मिळाले आहे. लेकींवरील प्रेम दाखवणारी त्याची ही फ्रेम एकदम खास अशीच आहे.
अंबातीची पत्नी विद्या ही सोशल मीडियावर फारशी सक्रीय दिसत नाही. पण तिने जे काही मोजके फोटो शेअर केले आहेत त्यात IPL ट्रॉफीसोबतचा हा खास फोटो दिसून येतो.
विद्या अनेकदा IPL मध्ये CSK सह आपल्या आयुष्याच्या जोडीदारासाला सपोर्ट करतानाही स्पॉट झाली आहे.
रायडू अनेकदा आपल्या पत्नीसोबतचे खास फोटो शेअर करताना दिसतो. दिवाळीच्या निमित्ताने त्याने पारंपारिक लूकमधील हा फोटो शेअर केला होता.
आता यापुढे रायडूच्या खास फोटोमध्ये चार ऐवजी पाच सदस्यांची खास फ्रेम पाहायला मिळेल.
क्रिकेटच्या मैदानात फलंदाजीतील धमक दाखवून देणारा अंबाती रायडू आता कॉमेंट्री पॅनलमध्ये क्रिकेट विश्लेषक आणि समालोचकाच्या रुपात काम करताना दिसत आहे.