भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या सुट्टीवर आहे.
भारत अ संघ पुढील आठवड्यात न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.
त्या संघातील चार दिवसीय सामन्यासाठीच्या संघात रहाणेला स्थान मिळाले आहे.
तत्पूर्वी रहाणेनं रणजी करंडक स्पर्धेत सहभाग घेतला. दोन सामन्यांत त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
वेळातवेळ काढून रहाणे पत्नी राधिका आणि कन्या आर्यासह गावात गेला आहे. तेथे त्यानं त्याच्या आजीची नातीशी भेट घडवून दिली.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत असताना त्याच्या घरी गोड बातमी आली होती.
अजिंक्य आणि राधिका धोपावकर हे शाळेतील मित्र...ही दोघ सोबतच लहानाची मोठी झाली आणि या प्रवासात त्यांची मनंही जुळत गेली.
26सप्टेंबर 2014मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला.