क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मुलाचे नाव राघव असे ठेवण्यात आले आहे
राघवच्या बारशाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
पारंपारिक मराठमोठ्या अंदाजात अगदी साध्या पद्धतीने हा बारशाचा सोहळा पार पडला
अजिंक्यची पत्नी राधिका निळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. गळ्यात मंगळसूत्र, साजेसे दागिने घालून ती नटली होती. तर अजिंक्यने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता.
राघवची झलकही इथे फोटोंमध्ये दिसते. अगदी ज्युनिअर अजिंक्य शोभून दिसतो.
अजिंक्य आणि राधिकाला एक मुलगीही आहे. तिचाही जन्म ५ ऑक्टोबरचाच. २०१९ मध्ये त्यांनी आर्या या मुलीला जन्म दिला.
दोघांचे मोठे कुटुंबीय या सोहळ्यात उपस्थित होते.
राघव पाळण्यात झोपवून कानात नाव सांगतानाचा फोटोही राधिकाने पोस्ट केला आहे