Join us

Vijay Hazare Trophy : वनडेत धावांची 'बरसात'! या ५ फलंदाजांसाठी उघडेल का टीम इंडियाचं दार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:39 IST

Open in App
1 / 8

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियाकडून पुन्हा कमबॅक करण्यासाठी अनेक क्रिकेट देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या रिंगणात उतरले आहेत.

2 / 8

भारतीय संघातील स्टार खेळाडू श्रेयस अय्यर देशांतर्गत कामगिरीच्या जोरावर पुन्हा भारतीय संघात कमबॅक करेल, अशी चर्चा रंगू लागलीये. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतूनच तो टीम इंडियात एन्ट्री करेल, असे वाटते. पण तुम्हाला माहितीये का? या स्टार खेळाडूपेक्षाही अन्य काही क्रिकेटर आहेत ज्यांनी देशांतर्गत स्पर्धेत एकदम क्लास कामगिरी करून टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे.

3 / 8

कोण आहेत ते फलंदाज ज्यांनी विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक धावा करून ठोठावलाय टीम इंडियाचा दरवाजा अन् 'सुपरस्टार कल्चर' बाजूला ठेवून बीसीसीआय या खेळाडूंना देईल का संधी यासंदर्भातील स्टोरी

4 / 8

मयंक अग्रवाल हा टीम इंडियाकडून खेळला आहे. पण संघात स्थान टिकवण्यात तो अपयशी ठरला. आता देशांतर्गत वनडे स्पर्धेत तो कर्नाटक संघाकडून धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ७ सामन्यातील ७ डावात त्याने ४ शतकांसह एका अर्धशतकाच्या मदतीने सर्वाधिक ६१३ धावा कुटल्या आहेत. या फलंदाजाची ही कामगिरी त्याला टीम इंडियाकडून वनडे संघातील प्रबळ दावेदार ठरवणारी आहे. पण यासाठी बीसीसीय निवड समिती काय विचार करणार त्यावर या फलंदाजाचे भवितव्य ठरेल.

5 / 8

विदर्भ संघाच्या ताफ्यातून खेळणाऱ्या करुण नायर यानेही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केलीये. ६ सामन्यातील ५ डावात त्याने चार शतकांच्या मदतीने ५२४ धावा ठोकल्या आहेत.

6 / 8

महाराष्ट्र संघातील युवा चेहरा सिद्धेश वीर यानेही देशांतर्गत वनडे स्पर्धेत आपल्यातील धमक दाखवून दिलीये. महाराष्ट्र संघाला बाद फेरीपर्यंत पोहचवण्यात या २३ वर्षीय फलंदाजाने मोलाचा वाटा उचलला आहे. ७ सामन्यातील ७ डावात २ शतक आणि २ अर्धशतकासह ४९० धावा करत तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपले तेवर दाखवलं असले तरी इतक्या लवकर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडणे मुश्किल आहे.

7 / 8

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत पंजाब संघाकडून खेळणारा प्रभसिमरन सिंग चौथ्या स्थानावर आहे. त्याने ७ सामन्यातील ७ डावात ३ शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ४८४ धावा केल्या आहेत.

8 / 8

या यादीत १७ वर्षीय मुंबईकर आयुष म्हात्रेचाही समावेश आहे. ७ सामन्यातील ७ डावात आयुषनं २ शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ४५८ धावा कुटल्या आहेत.

टॅग्स :विजय हजारे करंडकभारतीय क्रिकेट संघमयांक अग्रवालबीसीसीआय