मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते आणि तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चाही होते.
इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी ती गोव्यात सुट्टीसाठी गेली होती आणि तिच्या प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स मिळाले होते.
गोव्यात सुट्टीवर असताना ती एका खास व्यक्तिसोबत दिसली होती आणि तिच व्यक्ती आता लंडनमध्येही सारासोबत दिसली आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्या व्यक्तिसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.
सिद्धार्थ केरकर असे या व्यक्तीचे नाव आहे. १७ नोव्हेंबर २०२१मध्ये या व्यक्तिचं नाव चर्चेत आले होते. त्यावेळी साराने तिच्यासोबत इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता.
यात सारा जीपच्या फ्रंट सीटवरील दरवाज्यावर उभी असलेली दिसली होती आणि सिद्धार्थ सेल्फी घेत होता.
सारा सध्या लंडनमध्ये आहे आणि तिने शनिवारी इंस्टा स्टोरीवर मैत्रीण मार्टिना व सिद्धार्थ यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला.
सिद्धार्थ केरकर हा इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे जवळपास ८५ हजार फॉलोअर्स आहेत. तो एक आर्टिस्ट आहे आणि तो पेटिंग्स बनवतो.