ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
३६ वर्षीय फिंचच्या यशस्वी कारकिर्दीत त्याची पत्नी एमी ग्रिफिथ्सचा मोलाचा वाटा होता, तिने कठीण काळात साथ दिली.
अॅरॉन फिंचने एका मुलाखतीत आपली एक भारतीय मुलीसोबत अफेअर असल्याचे मान्य केले होते. मात्र, ते नातं टिकलं नाही
अॅरॉन फिंचने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ जिंकून दिला
२०१६ मध्ये आयपीएल दरम्यान फिंचने एमी ग्रिफिथ्सला प्रपोज केले होते. फिंच प्रपोज करेल याची तिला कल्पना नव्हती.
अॅरॉन फिंचने २०१८ साली एमी ग्रिफिथशी लग्न केले. एमी नेटवर्क इंटिग्रेशन स्पेशालिस्ट आहे.
अॅरॉन फिंचचे एमी ग्रिफिथशी लग्न होण्यापूर्वी एका भारतीय तरुणीसोबत अफेअर होते आणि तिनेच त्याला हिंदी शिकवले होते
फिंचच्या भारतीय मैत्रिणीचे कुटुंब मेलबर्नमध्ये राहते आणि तो तिला मुंबईत भेटला. मुंबईत एंटरटेनमेंट चॅनलमध्ये काम करते
अॅरॉन फिंचच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८८०४ धावा आहेत. वन डेत त्याची १७ शतके आहेत, तर ट्वेंटी-२०मध्ये २ शतके झळकावली आहेत.
अॅरॉन फिंचने ७६ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. २०१८ साली, फिंचने झिम्बाब्वे विरुद्ध ट्वेंटी-२० मध्ये १७२ धावांची खेळी खेळली, जी वेगवान क्रिकेटमधील फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.