Join us  

सरफराज खानकडून मोठी चूक, भारतीय संघात निवड न होण्यामागचं खरं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 11:48 AM

Open in App
1 / 8

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठीच्या भारतीय कसोटी संघातून सरफराज खानला डावलल्यामुळे सध्या बीसीसीआयला रोषाला सामोरे जावे लागत आहे. सुनील गावस्करांपासून अनेक माजी क्रिकेटपटूंनी निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत.

2 / 8

मात्र सरफराजची संघात निवड न होण्यामागचं नेमकं कारण बीबीसीआयमधील एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खराब तंदुरुस्ती आणि बेशिस्त वागणुकीमुळे सरफराज खानला भारतीय संघात स्थान मिळू शकलेलं नाही.

3 / 8

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फिटनेसबरोबरच सरफराज खानचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील बेशिस्त वर्तनही चिंतेचा आहे. त्याच्या काही गोष्टी शिस्तीच्या चौकटीत बसत नाहीत. सरफराज आणि त्याचे वडील आणि प्रशिक्षण नौशाद खान या बाबींवर लक्ष देतील.

4 / 8

सरफराज खानने रणजी करंडक स्पर्धेच्या गेल्या तीन हंगामात २५६६ धावा कुटल्या आहेत. ३७ प्रथमश्रेणी सामन्यात त्याने ७९.६५ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. मात्र तरीही नवोदित खेळाडूंना संधी देताना सरफराज खानची संघात निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

5 / 8

सरफराजची संघात निवड न झाल्याबद्दल माहिती देताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आपलं नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, वारंवार डावलले गेल्यामुळे कुणीही नाराज होणे साहजिक आहे. मात्र, तो ओव्हरवेट असल्याने संघात स्थान मिळवू शकत नाही. सरफराजला शारीरिक तंदुरुस्तीवर अजून खूप मेहनत घ्यावी लागेल.

6 / 8

सलग दोन हंगामात ९०० हून अधिका धावा काढणाऱ्या खेळाडूकडे कानाडोळा करण्यास निवड समिती काही मुर्ख नाही. त्याची संघाच निवड न होण्यामागील एक मोठं कारण त्याचा फिटनेस हे आहे , तो आंतरराष्ट्रीय स्तराचा अजिबात नाही.

7 / 8

सरफराजला याबाबत खूप मेहनत घ्यावी लागेल. तसेच आपलं वजन कमी करून फिटनेससह पुनरागमन करावं लागेल. मात्र संघात निवडीसाठी केवळ फिटनेस हाच केवळ निकष नाही आहे.

8 / 8

यावर्षी दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात शतक फटकावल्यानंतर सरफराजने आक्रमक पद्धतीने आनंद साजरा केला होता. ही बाब तिथे उपस्थित असलेल्या निवड समिती सदस्यांना रुचली नव्हती. तत्पूर्वी २०२२ च्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याच्या वर्तनामुळे मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित नाराज झाले होते.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध वेस्ट इंडिज
Open in App