आयपीएल २०२६ स्पर्धेतील एका बाजूला वैभव सूर्यवंशीसह काही युवा खेळाडू सातत्यपूर्ण आपल्यातील क्षमता सिद्ध करत असताना दुसरीकडे काही अनुभवी खेळाडू प्रत्येक सामन्यात धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळाले.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खास छाप सोडणाऱ्या पाच स्टार खेळाडूंना यंदाच्या हंगामात खातेही उघडता आलेले नाही. यात भारतीय संघातील दोन वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंचाही समावेश आहे.
न्यूझीलंडचा स्टार बॅटर फिन ॲलन याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकेदार कामगिरीसह लक्षवेधले होते. यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी तो ट्रम्प कार्ड ठरेल, अशी चर्चा रंगली होती.
टी २० वर्ल्ड कप २०२६ च्या सेमीफायनलमधील शतकवीर फिन ॲलन याने आयपीएलमधील ६ डावात फक्त ११० धावा केल्या आहे. ३७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पण यंदाच्या हंगामात त्याच्या फलंदाजीत ती धमक दिसली नाही.
हार्दिक पांड्याने ८ सामन्यात फक्त १४६ धावा केल्या असून ४० ही त्याची यंदाच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील दक्षिण आफ्रिकेचा स्टार डेविड मिलरलाही यंदाच्या हंगामता आपला किलर अवतार दाखवता आलेला नाही. ७ डावात ४१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील बिग हिटर शिवम दुबेही आपल्या फंलंदाजीतील खास धमक दाखवू शकलेला नाही. त्याने ८ सामन्यात फक्त १५० धावा केल्या असून ४५ ही त्याची सर्वोच्च धावंसख्या आहे.
लखनौच्या ताफ्यातील एडन मार्करमलाही यंदाच्या हंगामात ८ सामन्यानंतरही अजून अर्धशतक झळकावता आलेले नाही. ४५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.