Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओल्ड इज गोल्ड! IPL मधील धमाकेदार कामगिरीसह ‘या’ ५ धुरंधरांनी ठोठावला Team India चा दरवाजा

By सुशांत जाधव | Updated: April 22, 2026 13:10 IST

Open in App
1 / 8

आयपीएल २०२६ स्पर्धेतील लक्षवेधी कामगिरीसह युवा क्रिकेटर्संनीच नव्हे तर काही अनुभवी खेळाडूंनीही टीम इंडियात कमबॅकसाठी शड्डू ठोकला आहे.

2 / 8

इथं एक नजर टाकुयात अशा ५ अनुभवी भारतीय खेळाडूंवर ज्यांनी IPL मधील दमदार कामगिरीसह टीम इंडियाच्या टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र असल्याचे दाखवून दिले आहे.

3 / 8

पंजाब किंग्सचा 'सरपंच' श्रेयस अय्यर या यादीत सर्वात आघाडीवर आहे. पंजाब किंग्सच्या संघाकडून त्याने नेतृत्वासह फलंदाजीतील कर्तृत्व दाखवून दिले आहे. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो अखेरचा टी-२० सामना खेळला होता.

4 / 8

BCCI निवडकर्ते त्याला टीम इंडियाच्या टी-२० संघातून फार काळ बाहेर ठेवू शकणार नाहीत. तो कॅप्टन्सीच्या रुपात टीम इंडियात कमबॅक करेल, अशी चर्चा रंगू लागली आहे.

5 / 8

जवळपास पाच वर्षे टीम इंडिया बाहेर असलेला क्रुणाल पांड्याही IPL मध्ये आपल्या अष्टपैलूत्वाची खास झलक दाखवून देताना दिसतोय. २०२१ मध्ये त्याने भारतीय संघाकडून अखेरचा टी सामना खेळला होता.

6 / 8

अनुभवी जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने RCB कडून ६ सामन्यात १० विकेट्स घेत आपल्या स्विंगची जादू दाखवून दिली आहे. अनेक वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असल्यामुळे त्याचे करिअर संपल्यात जमा आहे, असे बोलेले गेले. पण त्याने आजही कमबॅकची धमक असल्याचे सिद्ध केले आहे.

7 / 8

मोहम्मद शमीनं टीम इंडियात कमबॅकची आशा अजूनही सोडलेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध केल्यावर IPL मध्ये तो LSG च्या ताफ्यातून आपल्या गोलंदाजीची धमक दाखवून देताना दिसते.

8 / 8

गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून प्रसिद्ध कृष्णानं ६ सामन्यात १२ विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारा प्रसिद्ध कृष्णाही पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकते. २०२३ मध्ये तो टीम इंडियाकडून अखेरचा टी-२० सामना खेळला होता.

टॅग्स :आयपीएल २०२६श्रेयस अय्यरमोहम्मद शामीक्रुणाल पांड्या