श्रीलंकेविरोधातील दुस-या एकदिवसीय मालिकेसाठी फिरकीपटू कुलदीप यादवऐवजी 18 वर्षीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे.
वॉशिंग्टन सुंदर हा तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू आहे.
5 ऑक्टोबर 1999 रोजी जन्मलेला वॉशिंग्टन अवघ्या 18 वर्षांचा आहे.
आयपीएलमध्ये त्याने गेल्या मोसमात रायझिंग पुणेकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. याशिवाय देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने उत्तम कामगिरी केली.
वॉशिंग्टन सुंदर उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो, तर डाव्या हाताने फलंदाजी करतो.