NZvENG : T20 कारकिर्दीतलं पहिलं शतक अन् तेही 48 चेंडूंत; इंग्लंडने रचला धावांचा डोंगर

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात डेवीड मलाननं तुफान फटेकबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 12:21 PM2019-11-08T12:21:11+5:302019-11-08T12:21:28+5:30

whatsapp join usJoin us
NZvENG : Maiden T20I hundred for Dawid Malan, 103* from 51 balls including 9 fours and 6 sixes; England score 241 runs  | NZvENG : T20 कारकिर्दीतलं पहिलं शतक अन् तेही 48 चेंडूंत; इंग्लंडने रचला धावांचा डोंगर

NZvENG : T20 कारकिर्दीतलं पहिलं शतक अन् तेही 48 चेंडूंत; इंग्लंडने रचला धावांचा डोंगर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माच्या आतषबाजीनंतर शुक्रवारी न्यूझीलंडमधील नेपीयर येथे आणखी एक वादळी खेळी अनुभवायला मिळाली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात डेवीड मलाननं तुफान फटेकबाजी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यातील मलानचे हे पहिलेच शतक ठरले आणि इंग्लंडकडून ट्वेंटी-20 त शतक करणारा मलान हा अॅलेक्स हेल्सनंतर दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 241 धावा चोपल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्यांची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.


इंग्लंडचा संघ 1-2 असा पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणं महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीनंच त्यांनी आज खेळ केला. पण, जॉनी बेअरस्टो ( 8) लवकर माघारी परतला. टॉम बँटन ( 31) याने मलानसह संघाचा डाव सावरला. पण, बँटन बाद झाल्यानंतर मलान व कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 182 धावांची विक्रमी भागीदारी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. मॉर्गनचे शतक अवघ्या 9 धावांनी हुकले. या सामन्यात मलानने 48 चेंडूंत शतक पूर्ण केले. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. मलान 51 चेंडूंत 9 चौकार व 6 षटकार खेचून 103 धावांवर नाबाद राहिला. 
मलानने इश सोढीच्या एका षटकात 28 धावा चोपून काढल्या.

विक्रमांचा पाऊस
- ट्वेंटी-20 क्रिकेटमधील इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्याः 3 बाद 241
- ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारीः 182 धावा मलान आणि मॉर्गन
- इंग्लंडकडून ट्वेंटी-20 त सर्वात जलद अर्धशतकः मॉर्गन ( 21 चेंडू)
- इंग्लंडकडून ट्वेंटी-20त सर्वात जलद शतकः मलान ( 48 चेंडू) 

Web Title: NZvENG : Maiden T20I hundred for Dawid Malan, 103* from 51 balls including 9 fours and 6 sixes; England score 241 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.