भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचा धुमधडाक्यात सुरू असलेला विवाह सोहळा अचानक रद्द करून लांबणीवर टाकण्यात आल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. तसेच यावरून आता उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. स्मृती मंधाना हिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने हे लग्न लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र नंतर लग्न टळण्यामागची वेगवेगळी कारणं समोर येऊ लागली आहेत. त्यात पलाश मुच्छल याचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. तसेच नात्यातील फसवणूक लक्षात आल्यानंतर स्मृती हिने पलाशसोबतचं लग्न मोडल्याचा दावाही केला जात आहे. आता या प्रकरणामध्ये क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे महावश हिचीही एंट्री होताना दिसत आहे.
युझवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे महावश हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून महावश हिने काहीश्या खोचक भाषेत संपूर्ण पुरुषवर्गालाचा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. तसेच माझ्या बॉयफ्रेंडने जर कुठल्या तरुणीला मेसेज पाठवले तर त्याचे चे स्क्रिनशॉट मी व्हायरल करेन, असेही महावश म्हणाली.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये आरजे महावश म्हणाली की, पुरुष मंडळी खूप प्रेमळ असतात. जेव्हा विचारू तेव्हा ते सिंगलच असतात. मला खरंखोटं माहिती माहिती नाही. पण माझ्या लग्नावेळी मी माझ्या नवऱ्याला एक आठवडा आधी इंटरनेटवर शेअर करणार नाही. तसेच माझा बॉयफ्रेड जर कुणाच्या मेसेज बॉक्समध्ये मधुचंद्र साजरा करत असेल, तर प्लिज मला येऊन सांगा. आता लग्न होतंय, ही कशी शोधेल, ही त्याच्यावर विश्वास ठेवत असेल, असं तुम्हाला वाटेल. पण नाही, मी या जगात कुणावरही विश्वास ठेवत नाही. हा मुलगा कुणासाठी काही करू शकत नाही, असं मी कुणाबाबत म्हणू शकत नाही. कुणीही काहीही करू शकतो. गरज पडल्यास तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट शेअर करा. किंवा मला वैयक्तिक मेजेस करा. मी ते शेअर करेन. कदाचित मी ते जाहीर करणारही नाही. मात्र मी केवळ नात्यामधून शांतपणे जाऊ इच्छिते. मित्रांनो वाचवा, असे आरजे महावश हिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, आरजे महावशने शेअर केलेल्या या व्हिडीओवर सव्वा लाखापेक्षा अधिक लाईक्स आलेल्या आहेत. तसेच कमेंटमधूनही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.