सुरेश रैनाच्या 'मीही ब्राह्मण' नंतर, आता रवींद्र जडेजाचं ट्विट; लोकांनी घेतलं निशाण्यावर, झाला ट्रोल!

टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजाही (Ravindra Jadeja) अपल्या एका ट्विटमुळे लोकांच्या निशाण्यावर आला आहे. सध्या जडेजा इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याने तेथूनच एक ट्विट केले आहे. (Cricketer Ravindra jadeja)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 11:27 AM2021-07-23T11:27:27+5:302021-07-23T11:27:50+5:30

whatsapp join usJoin us
Now controversy on Star Cricketer Ravindra jadeja posts rajput boy forever after suresh raina main bhi brahmin | सुरेश रैनाच्या 'मीही ब्राह्मण' नंतर, आता रवींद्र जडेजाचं ट्विट; लोकांनी घेतलं निशाण्यावर, झाला ट्रोल!

सुरेश रैनाच्या 'मीही ब्राह्मण' नंतर, आता रवींद्र जडेजाचं ट्विट; लोकांनी घेतलं निशाण्यावर, झाला ट्रोल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाच्या (Suresh Raina) 'मीही ब्राह्मण' वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद अद्या थांबलाही नाही. तोच, आता टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजाही (Ravindra Jadeja) अपल्या एका ट्विटमुळे लोकांच्या निशाण्यावर आला आहे. सध्या जडेजा इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याने तेथूनच एक ट्विट केले आहे. (Now controversy on Star Cricketer Ravindra jadeja posts rajput boy forever after suresh raina main bhi brahmin)

ट्विटमध्ये जडेजाने लिहिले आहे, राजपूत बॉय फोरएव्हर. अर्थात नेहमीसाठी राजपूत. जय हिंद! जडेजाचे हे ट्विट लोकांना पसंत आले नाही आणि तो ट्विटर यूझर्सच्या निशाण्यावर आला. लोक त्याला जातीवादाला प्रोत्साहन देऊ नकोस, असा सल्ला देत आहेत. 

जडेजाच्या ट्विटवर एका युझरने लिहिले आहे, की सर आपण लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात. आम्हाला आपल्याकडून अशी आशा नव्हती. आपला रंग, रूप आणि धर्म याला महत्व नाही. आम्ही आपल्यावर नेहमीच प्रेम करत आलो आहोत. 

आणखी एका युझरने लिहिले आहे, जातीवादामुळे देश बर्वाद आहे. जड्डूकडून अशा पोस्टची अपेक्षा नव्हती. एका उंचीवर पोहोचला असतानाही तो जातीवादाला प्रोत्साहन देत आहे. लज्जास्पद!

आणखी एका युझरने म्हटले आहे, व्यक्ती जन्माने महान ठरत नाही. आपण जे काही आहात, त्याचा अभिमान बाळगा, आपल्यावर थोपवण्यात आलेल्या लेबलवर नव्हे. 

रैनाचं वक्तव्य -
भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाने तामिळनाडू प्रीमिअर लीगच्या ( TNPL) लाईव्ह सामन्यादरम्यान चेन्नईच्या संस्कृतीचे कौतुक करताना मीही ब्राह्मण आहे, असे विधान केले होते. उत्तर प्रदेशच्या या खेळाडूच्या विधानामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. तामिळनाडू प्रीमिअर लीगचा पहिला सामना लिका कोवाई किंग्स आणि सालेम स्पार्टन्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यादरम्यान समालोचन करताना रैनाला चेन्नईच्या संस्कृतीबद्दल विचारण्यात आले होते. 

नेमकं काय म्हणाला होता रैना? -
यावर बोलताना रैना म्हणाला की,''मला वाटते, मीही ब्राह्मण आहे. २००४पासून मी चेन्नईत खेळतोय. मला येथील संस्कृती आवडते. मला माझे सहकारीही आवडतात. अनिरुद्ध श्रीकांत, सुब्रमणीयम बद्रीनाथ, लक्ष्मीपथी बालाजी यांच्यासोबत मी खेळलोय. चेन्नईकडून तुम्हाला काही चांगलं शिकायला हवं. चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य होण्यास मिळाल्याने, मी स्वतःला नशीबवान समजतो. आशा करतो आणखी काही सामने येथे खेळायला मिळतील.''  
 

Web Title: Now controversy on Star Cricketer Ravindra jadeja posts rajput boy forever after suresh raina main bhi brahmin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.