Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: झिम्बाब्वेचा 'सुपरमॅन'! ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा तगडा शॉट, फिल्डरने टिपला 'हवाहवाई' झेल

Zimbabwe beat Australia, ZIM vs AUS T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडून २३ धावांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:25 IST

Open in App

Zimbabwe beat Australia, ZIM vs AUS T20 World Cup 2026: सर्वाधिक वेळा क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आज तब्बल १९ वर्षांनी पुन्हा एकदा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. टी२० विश्वचषक स्पर्धेच्या ब गटात झिम्बाब्वेच्या संघाने त्यांना २३ धावांनी पराभूत केले. २००७च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतही झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली होती. सलामीवीर ब्रायन बेनेटच्या नाबाद ६४ धावांमुळे झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला १७० धावांचे आव्हान दिले होते. त्यात मॅट रेनशॉच्या अर्धशतकी (६५) खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला केवळ १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत २ गुण कमावले. या सामन्यात टोनी मुनीयोंगाने घेतलेला झेल विशेष चर्चेत राहिला.

मुनीयोंगाचा अप्रतिम झेल

१७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जॉश इंग्लिस (८) स्वस्तात बाद झाला. पाठोपाठ कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिड शून्यावर माघारी परतले. दुसरा सलामीवीर ट्रेव्हिस हेडदेखील १७ धावांवर बोल्ड झाला. मॅट रेनशॉने झुंजार अर्धशतकी खेळी केली. त्याने ४४ चेंडूत ६५ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलही ३१ धावांवर बाद झाला. दुखापतग्रस्त मार्कस स्टॉयनीसही (६) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर बेन ड्वारशूएसने मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. त्याचा फटका चुकला. त्यावेळी टोनी मुनीयोंगाने हवेत झेप घेत झेल घेतला. पाहा व्हिडीओ-

AUS vs ZIM Match Highlight Video:

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या संघाने २० षटकांत दमदार फलंदाजी २ बळी गमावून १६९ धावा केल्या. सलामीवीर मारूमानी २१ चेंडूत ३५ धावांवर बाद झाला. तर रायन बर्लने ३० चेंडूत ३५ धावा केल्या. दुसरा सलामीवीर ब्रायन बेनेट शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ५६ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ६४ धावा केल्या. तर दुसरीकडे कर्णधार सिकंदर रझा याने १३ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद २५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरुन ग्रीन आणि मार्कस स्टॉयनीस या दोघांनी १-१ बळी घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Zimbabwe Stuns Australia in T20 World Cup; Munyonga's Catch Steals Show

Web Summary : Zimbabwe defeated Australia in the T20 World Cup after 19 years. Zimbabwe set a target of 170, and Australia only managed 146. Munyonga's spectacular catch was a highlight.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६झिम्बाब्वेआॅस्ट्रेलियासोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओ