Join us

झहीर खानची सागरिकाच्या गावाला पहिली भेट , पाहा तिने अपलोड केलेला फोटो

लग्न आणि रिसेप्शननंतर आता ही नवविवाहीत जोडी आता सागरिकाच्या गावी पोहोचली आहे. तिथे जावयाचे बरेच लाड पुरवले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 12:56 IST

Open in App
ठळक मुद्देरजिस्टरपद्धतीने लग्न करून बंधनात अडकलेल्या क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगेची चर्चा सगळीकडे आहे. हे जोडपं आता सागरिकाच्या गावी म्हणजेच कोल्हापूरला रवाना झालं आहे.सागरिकानेच याविषयी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना चाहत्यांना माहिती दिली आहे. 

कोल्हापूर : रजिस्टरपद्धतीने लग्न करून बंधनात अडकलेल्या क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगेची चर्चा सगळीकडे आहे. गेल्या वर्षभरापासून एकमेंकांना डेट करत असलेले हे जोडपे २३ नोव्हेंबर रोजी बंधनात अडकले. त्यानंतर त्यांनी आता सगळ्यांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. सागरिकाच्या गावी म्हणजेच कोल्हापूरला हे जोडपं आता रवाना झालं असून मिस्टर खानने पहिल्यांदाच आपल्या बायकोच्या माहेरी आगमन केलं आहे. सागरिकानेच याविषयी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. 

लग्न जरी साध्या पद्धतीने केलं असलं तरीही त्यांनी आपल्या लग्नाची पार्टी दणक्यात केली होती. आपल्या प्रियजनांना कॉकटेल पार्टी तर रिसेप्शन म्हणून हॉटेल ताजमध्ये जंगी पार्टी करण्यात आली.  त्यानंतर हे जोडपं आता कोल्हापूरला जाऊन धडकलं आहे. कोल्हापूरच्या देवीच्या माथ्यावर डोकं टेकवून त्यांनी आपल्या संसाराची सुरुवात केली आहे. देवीचं दर्शन झाल्यानंतर झहिर खान आणि सागरिका हे सागरिकाच्या घरी गेले. मिस्टर खान पहिल्यांदाच कोल्हापूरच्या घरी आले असल्याची माहिती सागरिकाने आपल्या इन्स्टाग्रामवरून त्यांच्या चाहत्यांना दिली. त्यामुळे कोल्हापुरात राहणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनी आपल्या घरी येण्याचीही विनंती कॉमेंट्सच्या माध्यमातून केली आहे. 

तसंच, लग्न झाल्यानंतर या सुंदर जोडप्याचे फोटो एका फॅशन मॅगझिनच्या कव्हर पेजलाही झळकले होते. हे फोटोही सागरिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोशूटचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पण हे फोटोशूट ऑक्टोबरमध्ये करण्यात आलं होतं. मग, लग्नानंतर त्यांचे  फोटो जस्ट मॅरिड विशेषांकात प्रसिद्ध झाले. 

सागरिका इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटिझन्स आणि तिच्या फॅन्सचे लक्ष लागून राहिलेलं आहे. क्रिकेटर आणि अभिनेत्री विवाह बंधनात अडकल्याने आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या कपलकडेही त्यांच्या नेटीझन्सचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्कालाही सध्या ते कधी लग्न बंधनात अडकणार अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतय.

आणखी वाचा - Video : विराट-अनुष्काने धरला ठेका, झहीर-सागरिकाच्या रिसेप्शन पार्टीत थिरकली टीम इंडियाही

आणखी वाचा - झहीर खान आणि सागरिका घाटगेची रिसेप्शन पार्टी झाली अशी दणक्यात

टॅग्स :झहीर खानसागरिका घाटगेक्रिकेटबॉलीवूड