Join us

IPL नंतर युजवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीबरोबर अडकणार विवाहबंधनात?

ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 08:04 IST

Open in App

मुंबई- भारतीय क्रिकेटर आणि सध्या रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू (आरसीबी) या संघातून खेळणारा क्रिकेटर युजवेंद्र चहल लवकरच विवाहबंधनात अडकण्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार युजवेंद्र चहल कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूरला डेट करतो आहे. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. 

चहल सध्या आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळण्यात व्यस्त आहे. पण कॅच न्यूजनेच्या वृत्तानुसार युजवेंद्र चहल व तनिष्का कपूर आयपीएल संपल्यानंतर लग्न करणार आहे. त्यानंतर चहल टीम इंडियाबरोबर इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. युजवेंद्र व तनिश्का अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसतात त्यामुळे त्या दोघांमध्ये नक्कीच काही तरी असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. 

चहल व तनिश्का यांच्या लग्नाची चर्चा जर खरी ठरली तर पुन्हा एकदा क्रिकेटर व अभिनेत्रीची जोडी पाहायला मिळेल. मनसूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्या जोडीने क्रिकेटर व बॉलीवूडचं कनेक्शन सगळ्यांना दाखवलं होतं. त्यानंतर विराट कोहली-अनुष्का शर्मा, युवराज सिंग-हेजर कीच, हरभजन सिंग-गीता बसरा, जहीर खान-सागरीका घाटगे या जोड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं.  दरम्यान, युजवेंद्र चहल लग्नाची अधिकृत घोषणा कधी करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :युजवेंद्र चहललग्न