Join us

युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

Dhanashree Verma reacts to Yuzvendra Chahal Divorce: धनश्री वर्माशी घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच युजवेंद्र चहल उघडपणे बोलला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:18 IST

Open in App

Dhanashree Verma reacts to Yuzvendra Chahal Divorce: भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि युट्यूब स्टार धनश्री वर्मा यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. २०२० मध्ये कोरोना काळ सुरू असताना युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी आपल्या नातेसंबंधांबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी लग्न केले. सुरुवातीच्या काळात हे दोघेही आपल्या सोशल मीडियावरून कपल फोटो आणि इतरही मजेशीर रिल शेअर करताना दिसत होते. पण दीड-दोन वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला. हळूहळू त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही सुरू झाल्या आणि अखेर मार्च २०२५ मध्ये त्या चर्चा खऱ्या ठरल्या. नुकताच एका पॉडकास्टमध्ये आपल्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच युजवेंद्र चहल उघडपणे बोलला होता. त्यानंतर आता धनश्री वर्माने एक सूचक पोस्ट शेअर केली.

एकीकडे युजवेंद्र चहलने आपल्या घटस्फोटाबाबत आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाबद्दल स्पष्टपणे सांगितले. तर दुसरीकडे धनश्री वर्माने शांततेच्या मार्गाने गोष्टींना सामोरे जाण्यावर भर दिला. तिने काही फोटो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. "आयुष्यभर स्मरणात राहिल अशा ठिकाणी म्हणजेच दुबईतल्या हिंदू मंदिरात मी पुन्हा आले. इथल्या माझ्या खूप आठवणी आहेत. हे शहर मला सामावून घेते आणि वैयक्तिक विकासाला वाव देते. हे सारे पाहणे खूपच हृदयस्पर्शी आहे. या सुंदर हिंदू मंदिराला भेट दिल्याने शांत आणि शक्तिशाली झाल्यासारखे वाटते. संस्कृती आणि समुदायांना आपलेसे करून घेण्यात हे शहर किती आघाडीवर आहे याची आठवण करून देणारे हे मंदिर आहे. येथील संस्कृतीशी जोडले गेल्याचा मला अभिमान आहे. वैयक्तिक आयुष्यातील माझ्या विकासासाठी मी भाग्यवान समजतो," असे धनश्रीने लिहिले.

चहल धनश्रीबद्दल काय बोलला?

"आम्ही बऱ्याच महिन्यांपासून बोलत नव्हतो. घटस्फोट होण्याच्या ६-७ महिने आधीपासूनच आम्ही बोलणं बंद केलं होतं. फक्त काही कामासंदर्भात असेल तरच आम्ही बोलायचो. १९ जुलैच्या वर्ल्ड कप फायनलनंतर आमचं बोलणं खूपच कमी झालं. IPL 2025 साठी जो खेळाडूंचा लिलाव होणार होता, त्याआधी अंदाजे सप्टेंबर २०२४ मध्ये आमचा वकिलांच्यामार्फत एक व्हिडीओ कॉल झाला. त्या व्हिडीओ कॉलमध्ये आमचं शेवटचं एकमेकांशी बोलणं झालं. त्यानंतर मग आम्हा दोघांपैकी कुणीही एकमेकांशी आजपर्यंत काहीही बोललेलं नाही. मेसेज देखील नाही," असे युजवेंद्र चहलने स्पष्टपणे सांगितले.

टॅग्स :युजवेंद्र चहलघटस्फोटदुबई