चहल अन् RJ महावश यांनी मॅच पाहताना खरंच 'किसिंग' केलं का? Viral Videoचं सत्य काय?

Yuzvendra Chahal RJ Mahvash, IND vs NZ Champions Trophy 2025: युजवेंद्र चहल आणि RJ महावश दोघे यांच्या अफेअरच्या रंगल्या आहेत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 11:50 IST2025-03-11T11:41:56+5:302025-03-11T11:50:02+5:30

whatsapp join usJoin us
Yuzvendra Chahal kissed RJ Mahvash during Champions Trophy Finale after Divorce Dhanashree Verma FACT CHECK | चहल अन् RJ महावश यांनी मॅच पाहताना खरंच 'किसिंग' केलं का? Viral Videoचं सत्य काय?

चहल अन् RJ महावश यांनी मॅच पाहताना खरंच 'किसिंग' केलं का? Viral Videoचं सत्य काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Yuzvendra Chahal RJ Mahvash, IND vs NZ Champions Trophy 2025: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २०१३ नंतर पहिल्यांदाच भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्याचा मान मिळाला. या विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला. सर्व खेळाडूंनी आपल्या संघाला विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले. पण या संघात नसूनही भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याचीही चांगलीच चर्चा रंगली. तो आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma ) यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यातच सामन्यात चहल आणि एक तरूणी सोबत मॅच पाहताना दिसले. त्याबाबत चर्चा रंगली असतानाच, आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत या दोघांनी किस ( Kissing Video Viral ) केल्याचं बोललं जातंय. जाणून घेऊया त्यामागचे सत्य.

तो व्हिडीओ खरा की खोटा?

सामन्यात युजवेंद्र चहल एका तरुणीसोबत मैदानात सामना पाहायला आला होता. सर्वांना प्रश्न पडला होता की ती तरूणी कोण? त्याचे काही वेळातच उत्तर मिळाले. त्या तरूणीचं नाव आहे आरजे महावश. ती अभिनेत्री आणि रेडियो जॉकी आहे. ती चहल बरोबर सामना पाहायला आली होती. तिने सामन्याचा आनंद लुटला. त्यासोबतच ती अनेक वेळा चहलशी हसत-खेळत छान गप्पा मारताना दिसली. चहल आणि महावश यांच्यात खूप चांगली मैत्री असल्याचे त्यांच्यातील केमिस्ट्रीवरून दिसून आले. पण त्यासोबतच सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्या दोघांनी भरसामन्यात किस केल्याचे दिसतेय. पण हा व्हिडीओ खोटा असून, केवळ AI टूल्सच्या मदतीने हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

AI च्या माध्यमातून तयार केलेला व्हिडीओ-


हा व्हिडीओ खोटा असून असा कुठलाही प्रकार त्या दिवशी सामन्यात घडलेला नाही. व्हिडीओमध्ये स्पष्ट पणे दिसून येते की, हा व्हिडीओ AI टूल वापरून त्यांच्यासारखे दिसणारे दोन चेहरे एकत्र करून बनवण्यात आला आहे. बॉलिवूडशादीज चॅनेलने देखील म्हटले आहे की, एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात चहल आणि महावश यांच्यासारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याच्या मदतीने AI च्या सहाय्याने हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

दरम्यान, चहल आणि महावश दोघे भारताच्या विजयानंतर डिनरसाठीही गेले होते. त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. तसेच, धनश्री वर्माने चहल आण महावश यांच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर एक इन्स्टा स्टोरी ठेवली. त्यात तिने लिहिले की, आजकाल महिलांवर आरोप करणं ही एक फॅशनच झाली आहे. तसेच, तिने तिचे आणि चहलचे इन्स्टाग्रामवरील सर्व फोटोही पुन्हा एकदा अनअर्काईव्ह केले. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान एक वेगळाच ट्विस्ट आल्याचे दिसतेय.

Web Title: Yuzvendra Chahal kissed RJ Mahvash during Champions Trophy Finale after Divorce Dhanashree Verma FACT CHECK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.