Join us

Yuzvendra Chahal Hattrick Wife Dhanashree Reaction: युजवेंद्र चहलच्या झकास हॅटट्रिकनंतर पत्नी धनश्रीचं 'सैराट' सेलिब्रेशन (Video)

हॅटट्रिक मिळताच चहल मैदानावर पळू लागला अन् पत्नी धनश्री....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 01:27 IST

Open in App

Yuzvendra Chahal Hattrick Wife Dhanashree Reaction, IPL 2022 RR vs KKR: युजवेंद्र चहलच्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर राजस्थानने कोलकातावर विजय मिळवला. राजस्थानने सलामीवीर जोस बटलरच्या शतकाच्या जोरावर २१७ धावा केल्या. पण या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरही दमदार फलंदाजी करत होता. त्यावेळी युजवेंद्र चहलने चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यर, पाचव्या चेंडूवर शिवम मावी आणि सहाव्या चेंडूवर पॅट कमिन्स अशा तीन सलग विकेट्स घेत त्याच्या कारकिर्दीतील आणि यंदाच्या हंगामातील पहिली हॅटट्रिक साकारली. त्याने हॅटट्रिक घेताच त्याची पत्नी धनश्री वर्मा-चहल हिने सैराट सेलिब्रेशन केले. पाहा व्हिडीओ-

२१८ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा सलामीवीर सुनील नारिन चेंडू न खेळताच धावचीत झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि आरोन फिंच जोडीने १०७ धावांची भागीदारी केली. फिंच ५८ धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरत ५१ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ८५ धावा केल्या. पण युजवेंद्र चहलने मोक्याच्या वेळी हॅटट्रिक घेत सामना फिरवला. पाहा युजवेंद्र चहलची हॅटट्रिक-

दरम्यान, राजस्थानकडून खेळताना युजवेंद्र चहलने ४ षटकांत ४० धावा देऊन पाच बळी टिपले. त्याआधी राजस्थानच्या फलंदाजीच्या वेळी सलामीवीर देवदत्त पडिकल (२४), संजू सॅमसन (३८) आणि शिमरॉन हेटमायर (२६) यांनी दमदार फलंदाजी दिली. या साऱ्यांवर वरचढ ठरत जोस बटलरने करत ५९ चेंडूत शतक ठोकले. तो ६१ चेंडूत १०३ धावांवर बाद झाला. जोस बटलरने तुफान फटकेबाजी करत ९ चौकार आणि ५ षटकारांनी आपली खेळी सजवली.

टॅग्स :आयपीएल २०२२युजवेंद्र चहलराजस्थान रॉयल्ससोशल मीडिया
Open in App