Join us

युजवेंद्र चहलनं केली अनुष्का शर्माकडे 'अजब' विनंती; म्हणाला आशा करतो कोहली ऐकेल

फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी टीम इंडिया खेळाडूंची फिरकी घेण्यास उत्सुक असतो. रोहित शर्मा, कुलदीप यादव, विराट कोहली हे त्याचे नेहमीचे टार्गेट आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 13:41 IST

Open in App

फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी टीम इंडिया खेळाडूंची फिरकी घेण्यास उत्सुक असतो. रोहित शर्मा, कुलदीप यादव, विराट कोहली हे त्याचे नेहमीचे टार्गेट आहेत. पण, आता चहलनं त्याचा मोर्चा टीम इंडियाचा कर्णधार कोहलीच्या पत्नीकडे म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माकडे वळवला आहे. लॉकडाऊनच्या काळात टिक टॉक व्हिडीओ तयार करण्यात व्यग्र असलेल्या चहलनं अनुष्काला एक विनंती केली आहे आणि कोहली ती मान्य करेल अशी आशाही व्यक्त केली.

या लॉकडाऊनच्या काळात सर्व क्रिकेटपटू आपापल्या कुटुंबीयांना वेळ देत आहेत. अजिंक्य रहाणे, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, चेतेश्वर पुजारा, हार्दिक पांड्या आदी आपल्या कुटुंबीयांना वेळ देण्याबरोबर घरच्या कामातही हातभार लावत आहेत. पण, सध्या विराट-अनुष्का यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट आणि पत्नी अनुष्का लोकांना घरी राहण्याचं आवाहन करत आहे.  या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात अनुष्का विराटकडे एक भलतीच डिमांड करत आहे. ती म्हणतेय,''ए कोहली, ऐ कोहली, चल चौका मार.''

अनुष्का शर्मानं हा व्हिडीओ पोस्ट करून लिहीले की,''कोहली क्रिकेटला मिस करत असेल. मैदानावर चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाची त्याला आठवण येत असेल. त्यामुळे त्याला तो स्टेडियमवरचा अनुभव देण्याचा हा प्रयत्न.'' अनुष्काच्या या व्हिडीओखाली चहलनं विनंती केली की,''भाभी कृपया पुढच्या वेळेले चहलला ओपनिंगला पाठवा, चहलला ओपनिंगला पाठवा, असं म्हणा. तुमचं तो ऐकेल अशी अपेक्षा.''  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

बबिता फोगाटची 'तबलिगी जमात' वर वादग्रस्त पोस्ट; महाराष्ट्रात पोलीस तक्रार दाखल

बबिता फोगाटला 'Terrorist' म्हणणाऱ्यावर भडकली Jwala Gutta; म्हणाली...

Viral Video : 'शीला की जवानी' वर थिरकला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 

MS Dhoniचा तीन वर्षांचा Future Plan ठरलाय!

डॉक्टर्स, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; टीम इंडियाच्या माजी कर्णधाराची मागणी

टॅग्स :युजवेंद्र चहलअनुष्का शर्माविराट कोहली