Join us

युजवेंद्र चहल बोहल्यावर चढणार, लग्नाबद्दल दिली 'ही' माहिती

क्रिकेटपटूंच्या आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये नेहमी असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 18:49 IST

Open in App

क्रिकेटपटूंच्या आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये नेहमी असते. त्यांची हीच उत्सुकता जाणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे. भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच बोहल्यावर चढणार आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चहलने त्याच्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे. 

चहलला या कार्यक्रमात त्याचे वय विचारण्यात आले. तेव्हा लाजत चहलने त्याचे वय 29 वर्ष असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच त्याला लग्नाचं वय झालंय आता लग्न करायला हवं, असा अँकरने सल्ला दिला. त्याने लग्नाची तयारी सुरू असल्याचे सांगितले. 

23 जुलै 1990 साली हरयाणा येथील चहलचा जन्म. त्याने 50 वन डे सामन्यांत 5.06 च्या इकॉनॉमीनं 85 विकेट्स घेतल्या आहेत. 42 धावांत 6 विकेट्स ही त्याची वन डेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 31 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत 46 विकेट्स घेतल्या आहेत आणि 25 धावांत 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत चहल आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली होती. 

टॅग्स :युजवेंद्र चहलभारतीय क्रिकेट संघ