Yuzvendra Chahal: पाच वर्षांपूर्वी लग्नबंधनात बांधलेल्या भारतीय संघाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात कदाचित सगळं काही ठीक चाललं नसल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या येत आहेत. युझवेंद्र आणि धनश्री या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांना अनफॉलो करत त्यांचे फोटो डिलीट केल्याचेही म्हटलं जात होतं. धनश्रीच्या इन्स्टाग्रामवर अजूनही तिच्या लग्नाचा फोटो आहे. ज्यामुळे या जोडप्यामध्ये काही मतभेद आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशातच युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
भारतीय संघाचा स्टार खेळाडू युझवेंद्र चहल हा त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि अनेक वृत्तांमध्ये युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा होत आहे. दरम्यान, युजवेंद्र चहलचा फोटो वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसत आहेत. चहलच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तो एका मुलीसोबत फिरताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर ती मुलगी चहल आणि धनश्री यांच्यातील मतभेदाचे कारण असू शकते, अशीही चर्चा सुरु झालीय. मात्र नेमकं काय घडलं हे सध्या कोणालाच माहीत नाही. दरम्यान, युजवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चहचने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये महान तत्वज्ञानी सॉक्रेटिस यांचा एक कोट लिहिला आहे. युझवेंद्र चहलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये गोंगाटाला योग्य उत्तर शांतता असल्याचे चहलने म्हटलं आहे. "शांतता हे सर्वात खोल संगीत आहे जे प्रत्येकजण गोंगाटातही ऐकू शकतो," अशी चहलची स्टोरी आहे.
दरम्यान, धनश्री आणि युझवेंद्र चहलची प्रेमकहाणी करोना काळात सुरू झाली. चहल नृत्यदिग्दर्शक असलेल्या धनश्रीकडे डान्स शिकण्यासाठी आला. धनश्रीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चहल प्रभावित झाला आणि अशा प्रकारे लवकरच दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि नंतर हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. दोघांनी २२ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले.