Join us

युवराज सिंगच्या आईला 50 लाखांचा चुना, ED कडून तपास सुरू

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याची आई शबनम कौर यांना एका बनावट कंपनीने 50 लाखांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 11:24 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याची आई शबनम कौर यांना एका बनावट कंपनीने 50 लाखांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. शबनम कौर यांनी पुंजी योजनेत जवळपास एक कोटी रक्कम गुंतवली होती, परंतु त्यातील केवळ निम्मी रक्कम त्यांना मिळवण्यात यश आले आहे. त्यांच्याप्रमाणे अशा अनेक गुंतवणुकदारांचे पैसे या कंपनीने बुडवल्याचे समोर आले आहे आणि मुंबईतील ED (अंमलबजावणी संचालनालय) तपास करत आहे.

या योजनेचा व्यवस्थापक हा साधना इंटरप्राईज या नावाच्या कंपनीशी निगडीत असून त्यांनी युवराजच्या आईला गुंतवणुकीवर प्रतीवर्ष 84% परतावा मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार युवराजच्या आईला 50 लाख रुपये मिळालेही, परंतु काही महिन्यांनंतर या कंपनीने पैसे देणे बंद केले. कंपनी विरोधात मनी लाँडरींग कायद्यानुसार तक्रार दाखल झाल्या आहेत. 

याआधी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि फुलराणी सायना नेहवाल यांनाही अनुक्रमे 15 कोटी व 75 लाखांचा गंडा घातला गेला आहे. त्याचाही तपास सुरु आहे.  

टॅग्स :युवराज सिंगगुन्हेगारी