Yuvraj Singh Heated Argument With Tino Best : रायपूरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या इंटरनॅशनल मास्टर्स लीग टी-२० च्या यंदाच्या हंगामात सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्स संघानं फायनल बाजी मारली. ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील सामन्यात भारतीय संघानं ६ विकेट्स राखून दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यात युवराज सिंग आणि वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील खेळाडू टिनो बेस्ट यांच्यात वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. सामन्या दरम्यान मैदानात दिसलेले हे दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं काय घडलं कोणत्या मुद्यावरुन दोघांच्यात वाजलं जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोलंदाजी करून डगआउटमध्ये निघालेला, पण युवीनं त्याला कायदा दाखवला
रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेलेल्या फायनल लढतीत टिनो बेस्ट गोलंदाजी करून दुखापतीच्या बहाण्याने डगआउटमध्ये जाण्याच्या विचारात होता. पण युवराज सिंगनं यावर आक्षेप घेतला. भारताच्या या स्टार क्रिकेटरचा मुद्दा योग्य ठरवत अंपायरने टिनो बेस्टला मैदान सोडण्यास परवानगी नाकारली. हा राग काढण्यासाठी मग तो युवीच्या अंगावर धावला. आता हे सगळं घडतं असताना शांत बसेल तो युवी कसला. युवराज सिंगही तापला. दोघांच्यात पेटलेला वाद मिटवण्यासाठी मैदानातील पंच आणि अन्य खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. युवराज आणि टिनो बेस्ट यांच्यातील वादाचा मुद्दा सध्या सोशल मीडियावर गाजताना दिसतोय.
युवीचा सिक्सर किंगवाला तोरा
युवराज सिंगनं या वादाआधी स्पर्धेत आपल्या भात्यातील फटकेबाजीनंही लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. ऑस्ट्रेलिया मास्टर्स विरुद्धच्या सेमीफायनल लढतीत युवीच्या भात्यातून षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली होती. त्याने १ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ३० चेंडूत केलेली ५९ धावांची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली होती. या एका अर्धशतकासह या स्पर्धेत त्याने ६ सामन्यातील ५ डावात १७९ धावा करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
Web Title: Yuvraj Singh Tino Best Heated Argument India Masters vs West Indies Masters Final Match Watch Viral Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.