Join us

युसूफ पठाणनं २० चेंडूत ठोकली फिफ्टी! युवीनंही लंकेला धु धु धुतलं!

स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाणची फिफ्टी, युवीनंही केली तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 21:51 IST

Open in App

India Masters vs Sri Lanka Masters, 1st Match : इंडिया मास्टर्स विरुद्ध श्रीलंका मास्टर्स यांच्यातील लढतीनं इंडरनॅशनल मास्टर्स लीग टी२० स्पर्धेला सुरुवात झाली आहे.  नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सलामीच्या लढतीत युसूफ पठाणनं अवघ्या २० चेंडूत अर्धशतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेच्या संघानं या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या युसूफ पठाणनं या सामन्यात २२ चेंडूत ३ चौकार आणि ६ उत्तुंग षटकाराच्या मदतीने ५६ धावा कुटल्या. त्याने तब्बल २५४.५५ च्या स्ट्राइकरेटन धावा कुटल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इंडिया मास्टर्स संघाकडून स्टुअर्ट बिन्नीनं केली सर्वोच्च खेळी

युसूफ पठाण आधी या सामन्यात इंडिया मास्टर्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या स्टुअर्ट बिन्नी यानेही आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश केला. २६ धावांवर इंडिया मास्टर्स संघानं अंबाती रायडू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रुपात दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर स्टुअर्ट बिन्नी आणि गुरुक्रीत सिंग मान या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची दमदार भागीदारी रचली. गुरुक्रीत सिंग मान याने ७ चौकाराच्या मदतीने ३२ चेंडूत ४४ धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीनं ३१ टेंडूत ३ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ६८ धावांची खेळी केली. इंडिया मास्टर्स संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च खेळी ठरली. धावफलकावर १४६ धावा असताना स्टुअर्ट बिन्नीनं आपली विकेट गमावली.

मग जमली युसूफ पठाण अन् युवी जोडी

अखेरच्या ५० चेंडूत युवी आणि युसूफ पठाण यांनी इंडिया मास्टर्सकडून तुफान फटकेबाजी केली. युवराजनं २२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ३१ धावांची खेळी केली. दुसरीकडे युसूफ पठाणनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर या जोडीनं अखेरच्या षटकात ७६ धावांची भागीदारी रचत निर्धारित २० षटकात धावफलकावर ४ बाद २२२ धावा लावल्या.

टॅग्स :टी-20 क्रिकेटभारत विरुद्ध श्रीलंकायुवराज सिंगयुसुफ पठाण