पाकिस्तानी गोलंदाज वाहब रियाझ ( Wahab Riaz) यानं सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो चक्क रस्त्यावर चणे विकताना दिसतोय.. त्याच्या या व्हिडीओवर पाकिस्तानी क्रिकेटपटू अहमद शहजाद याच्यासह अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. रियाझनंही गंमत म्हणून हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या तो क्रिकेटपासून काहीकाळ दूर असला तरी त्याच्यावर चणे विकण्याची वेळ आलेली नाही.
रियाझनं २७ कसोटी, ९१ वन डे व ३६ ट्वेंटी-२० सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत ८३, वन डेत १२० आणि ट्वेंटी-२०त ३४ विकेट्स आहेत. फलंदाजीतही त्यानं योगदान देताना १०००+ आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. वन डेत त्यानं तीन अर्धशतकं झळकावली आहेत. पण, मागील दोन वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०२०मध्ये त्यानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-२० सामना खेळला होता. २०१८नंतर तो कसोटी सामना खेळलेला नाही.