Join us

विश्वचषक स्पर्धा युवा भारतीय जिंकतील - रोहित शर्मा

‘भारताचा १९ वर्षांखालील संघ विश्वचषक विजेता होईल,’ असा विश्वास भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा याने बुधवारी व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 03:57 IST

Open in App

आॅकलंड : ‘भारताचा १९ वर्षांखालील संघ विश्वचषक विजेता होईल,’ असा विश्वास भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा याने बुधवारी व्यक्त केला. गतविजेत्या भारताने श्रीलंका आणि जपानला नमवून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.टिष्ट्वट करीत रोहित म्हणाला,‘भारताच्या १९ वर्षांखालील संघाला शुभेच्छा. संघाची सुरुवात शानदार झाली. भारतीय संघ जेतेपद कायम राखू शकतो.’ प्रियम गर्ग याच्या नेतृत्वात भारताने जपानला १० गड्यांनी नमवून युवा विश्वचषकाच्या सुपर लीग उपांत्यपूर्व फेरीामध्ये प्रवेश केला. भारताची गाठ आता न्यूझीलंडविरुद्ध पडेल. भारताने २०१८ ला पृथ्वी शॉच्या नेतृत्वात १९ वर्षांखालील विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ