Join us  

वेस्ट इंडिजमध्ये द्विशतक रचत 'या' युवा फलंदाजाने रचला विक्रम

मग तुम्ही विचार करत असाल की, हे द्विशतक नेमके झळकावले कोणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 6:23 PM

Open in App

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. पण या संघातील एकानेही या दौऱ्यावर द्विशतक झळकावलेले नाही, मग तुम्ही विचार करत असाल की, हे द्विशतक नेमके झळकावले कोणी? सध्या भारताच्या मुख्य संघाबरोबर भारताचा 'अ' संघदेखील वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या संघातील शुभमन गिलने दमदार द्विशतकी खेळी साकारली आहे. त्याच्या या खेळीचे क्रिकेट विश्वात कौतुक होत असून या द्विशतकासह गिलने एक विक्रमही रचला आहे.

गिलने द्विशतक साकारताना भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा विक्रमही मोडीत काढला आहे. गिलने येथील अनधिकृत कसोटी सामन्यामध्ये 257 चेंडूंमध्ये 19 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 204 धावांची खेळी साकारली आहे.

गिलचे हे द्विशतक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नोंदवले जाणार आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारा गिल हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. गिलने 19 वर्षे आणि 334 दिवस, एवढे वय असताना द्विशतक झळकावले आहे. गिलने यावेळी गंभीरला पिछाडीवर टाकले आहे. गंभीर 20 वर्षे आणि 124 दिवसांचा असताना त्याने द्विशतक झळकावले होते. पण आता गंभीरचा विक्रम गिलने मोडीत काढला आहे. गिलने तब्बल 17 वर्षांनंतर गंभीरचा हा विक्रम मोडीत काढला आहे.

टॅग्स :शुभमन गिलगौतम गंभीर