Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोनी तू नेहमीच आमचा कर्णधार असशील : कोहली

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 300 न-डे खेळणारा भारताचा सहावा तसेच जगातील 20 खेळाडू बनला. लंकेविरुद्ध चौथ्या वन-डेत ही कामगिरी करताच माजी दिग्गज सचिनसह संघाचा कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि ईशांत शर्मा यांनी माहीचे अभिनंदन केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 07:22 IST

Open in App

कोलंबो, दि . 1 - माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 300 न-डे खेळणारा भारताचा सहावा तसेच जगातील 20 खेळाडू बनला. लंकेविरुद्ध चौथ्या वन-डेत ही कामगिरी करताच माजी दिग्गज सचिनसह संघाचा कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि ईशांत शर्मा यांनी माहीचे अभिनंदन केले. धोनीच्या विशेष उपलब्धीबद्दल कोहलीने संघाच्या वतीने त्याला स्मृतिचिन्ह भेट दिले. तुला स्मृतिचिन्ह देणे माझ्यासाठी गौरवास्पद असून, तू नेहमी आमचा कर्णधार असशील, असे विराट म्हणाला.

यावेळी बोलताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली भावूक झाला. धोनीबद्दल काय बोलायचं. आमच्यापैकी 90 टक्के खेळाडूंनी त्यांच्या करिअरची सुरुवात धोनीच्याच नेत्तृत्वात केली आहे. त्याचा हा सन्मान करणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तू हमी आमचा कर्णधार राहिल, असं विराट म्हणाला. कोलंबो वन डेत धोनीनं नाबाद 49 धावांची खेळी केली. मनीष पांडे आणि कारकिर्दीतील महेंद्रसिंह धोनी यांनी सहाव्या विकेटसाठी वेगवान शतकी भागीदारी करून अखेरच्या १२.२ षटकांत १०१ धावा वसूल केल्या. धोनीने भारताकडून २९७ तसेच तीन सामने आशिया एकादशकडून खेळले आहेत. आज त्याने नाबाद ४९ धावा केल्या. वन-डेत शंभर अर्धशतकांची नोंद करण्याची त्याला आजच संधी होती, पण एका धावेमुळे ही संधी हुकली. ४६३ वन-डे खेळलेल्या सचिनने ३००वेळा वन-डे कॅप घालणे ही अप्रतिम कामगिरी आहे, या शब्दांत धोनीचे कौतुक केले.कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजाच्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 168 धावांनी धुव्वा उडववत विजयी चौकार लगावला. या शानदार विजयासह भारताने 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने श्रीलंकेसमोर 376 धावांचे आव्हान ठेवलं होतं. यानंतर भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेचा डाव ४२.४ षटकांत २०७ धावांमध्ये संपुष्टात आला. विशेष म्हणजे, घरच्या मैदानावर लंकेचा हा सर्वांत मोठा पराभव ठरला. माजी कर्णधार अ‍ॅन्जोलो मॅथ्यूज (७0) शिवाय श्रीलंकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. मिलिंदा सिरिवर्दनाने (३९) त्यातल्या त्यात काहीशी झुंज दिली.

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेटएम. एस. धोनीबीसीसीआयभारतश्रीलंका