OMG... फलंदाजाला 'असं' आऊट होताना तुम्ही यापूर्वी पाहिलं नसेल, पाहा हा व्हिडीओ

हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला असून तो पाहून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 19:41 IST2019-02-26T19:40:53+5:302019-02-26T19:41:24+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
You have not seen before, when the batsman gets 'out' like this, watch this video | OMG... फलंदाजाला 'असं' आऊट होताना तुम्ही यापूर्वी पाहिलं नसेल, पाहा हा व्हिडीओ

OMG... फलंदाजाला 'असं' आऊट होताना तुम्ही यापूर्वी पाहिलं नसेल, पाहा हा व्हिडीओ

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात काय होईल, हे सांगणेच न बरे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट जगतामध्ये बऱ्याच अजब गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. एका सामन्यात तर फलंदाज ज्यापद्धतीने बाद झाला, ते यापूर्वी पाहायला मिळाले नव्हते. हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला असून तो पाहून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियामधील एका सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यामध्ये एक सामना खेळवला जात होता. हा सामना न्यू साऊथ वेल्स संघाने जिंकला. पण या सामन्याच्या चौथ्या दिवशी ही धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली. 

सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत होता. त्यावेळी चौथ्या दिवसाच्या 47व्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. न्यू साऊथ वेल्स संघाचा जेसन संघा यावेळी गोलंदाजी करत होता, तर दक्षिण ऑस्ट्रेलियाचा हिल्टन कार्टराइट फलंदाजी करत होता. 47व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हिल्टनने पूलचा फटका मारला. त्यावेळी हा चेंडू शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर हा चेंडू हेल्मेटला लागून उंच उडाला आणि जेसनने आपल्याच गोलंदाजीवर असा चम्तकारीक झेल पकडला. 

पाहा हा वायरल झालेला व्हिडीओ


Web Title: You have not seen before, when the batsman gets 'out' like this, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.